शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: September 25, 2022 18:27 IST

तपास सुरु असून जर तसे काही आढळून आले, तर पुणे पोलीस आयुक्तांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

पुणे :  पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (पीएफआय)च्या कार्यकर्त्यांनी जर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा केली असेल, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. त्याप्रमाणे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना रविवारी दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) देशभरात पीएफआय विरोधात कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईचे पडसाद पुण्यात उमटले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी कारवाई विरोधात घोषणाबाजी केली.  त्यामध्ये कथित पाकिस्तानसमर्थक घोषणाबाजीवरून फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, पीएफआयबाबत चौकशी करण्यात येत आहे. जर पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या गेल्या असतील, तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यांच्यावर देशद्रोहाच गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याबाबत तपास करण्यात येत आहे. जर तसे काही आढळून आले, तर पुणे पोलीस आयुक्तांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

...तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल 

 सोशल मीडिया मधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते एकत्र करून आम्ही त्याचे फॉरेन्सिक करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया वरुन जे काही व्हिडिओ आहेत ते तपासातून निष्पन्न होत आहेत.  त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. ज्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील जे काही कलम असतील ते आम्ही ऍड करणार आहोत. पोलिसांची कडक भूमिका आहे जे लोक निष्पन्न होतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणSocialसामाजिकPoliceपोलिसMuslimमुस्लीम