शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही काँग्रेसचा २२१ जागांचा विक्रम मोडू : प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 21:04 IST

घराणेशाही, भ्रष्टाचार, राष्ट्रविरोधी भूमिकांना पाठिंबा व नेतृत्व यामुळे काँग्रेस दिवाळखोरीत गेली.

ठळक मुद्देसगळे विरोधी पक्ष दिवाळखोरमोजक्याच जागा लढवणारे विरोधी पक्षाची भूमिका मतदारांकडे मागत आहेत.

पुणे: देशात व राज्यातही सलग ५ वर्षे काम करून नरेंद्र मोदी, देवेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास मिळवला आहे. त्यामुळेच देशात पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. आता महाराष्ट्रातही तेच होणार असून काँग्रेसने राज्यात कधीकाळी केलेला २२१ जागांचा विक्रम मोडू, असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

निवडणूक प्रचारासाठी म्हणून जावडेकर पुण्यात आले होते. खासदार गिरीश बापट यावेळी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, घराणेशाही, भ्रष्टाचार, राष्ट्रविरोधी भूमिकांना पाठिंबा व नेतृत्व यामुळे काँग्रेस दिवाळखोरीत गेली. राष्ट्रवादीची अवस्था वेगळी नाही. कोणत्याही विरोधी पक्षात ताकद नाही. मोजक्याच जागा लढवणारे विरोधी पक्षाची भूमिका मतदारांकडे मागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने देशात व महाराष्ट्रात ५ वर्षे काम केले. तेच जनतेच्या मनात आहे. काही डावे पक्ष भाजपाला पाशवी बहुमत मिळाले म्हणतात, मात्र हे लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिलेले सरकार आहे. त्या लोकांच्या विश्वासाचा अपमान डावे पक्ष करत आहेत.जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांना काँग्रसने पाठिंबा दिला. ३७० कलम रद्द केले तर राहूल गांधींना तिथे गोळीबार सुरू असल्याचे स्वप्न पडले. कलम रद्द केल्यापासून ७५ दिवसात तिथेही एकही गोळी झाडली गेली नाही. राहूल यांच्या वक्तव्याचा फायदा पाकिस्ताननेघेतला. अशा राष्ट्रविरोधी भुमिकांमुळेच तो पक्ष दिवाळखोरीत गेला. अशा पक्षातील नेत्यांनाच भाजपाने प्रवेश दिला आहे याकडे लक्ष वेधले असता जावडेकर म्हणाले, पक्ष भरकटला असे ज्या काही चांगल्या लोकांना वाटले तेच आमच्या पक्षात आले आहेत. राज्याच्या प्रचारात ३७० कलम रद्द केल्याचा मुद्दा कशासाठी यावर जावडेकर यांनी राष्ट्रवाद हा निवडणुकीतील मुद्दा असू नये का असा प्रतिप्रश्न केला. विकासाच्या कामांचाही मुद्दा प्रचारात आहेच असे ते म्हणाले.रार्ष्टीय नागरिकत्वाचा मुद्दा (एनआरसी) काँग्रेसचाच होता, आता तो राबवला जातो आहे तर त्यावर टिका होते. जीएसटी लागू केला, त्यावेळी काँग्रेसचे तब्बल ७ माजी मंत्री त्याविषयीच्या समितीमध्ये होते. त्यांच्या सुचनांवरूच दर वगैरे ठरवण्यात आले. आता तेच विरोध करत आहेत. काश्मिरच्या मुद्द्यावर काँग्रेसने सभागृहात बाजूने मतदान केले व आता त्याविरोधात बोलत आहेत. त्यांचा हा दुटप्पीपणा जनतेच्या आता लक्षात आला आहे अशी टीका जावडेकरांनी केली. भाजपाचे उज्वल केसकर, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, अ‍ॅड. मंदार जोशी, परशूराम वाडेकर, नगरसेवक महेश लडकत आदी यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPrakash Javadekarप्रकाश जावडेकरElectionनिवडणूकPoliticsराजकारण