शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोरगं नशीबवान होतं म्हणून आम्ही वाचलो!

By admin | Updated: July 28, 2015 00:32 IST

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत काही घरांमधील संपूर्ण कुटुंब गेले; पण रुद्र या चिमुकल्या तीन महिन्यांच्या बालकाने रडून मदतकार्यासाठी

घोडेगाव : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत काही घरांमधील संपूर्ण कुटुंब गेले; पण रुद्र या चिमुकल्या तीन महिन्यांच्या बालकाने रडून मदतकार्यासाठी आलेल्या गावकऱ्यांना जागे केले. यामुळे त्याची आई, आजी, आजोबा वाचले. हा रुद्र आता एक वर्ष व तीन महिन्यांचा झाला आहे. मुलगा नशीबवान असल्यामुळे एवढ्या भयंकर दुर्घटनेतून वाचलो असल्याचा आनंद व नातेवाईक दुर्घटनेत मरण पावल्याचे दु:ख त्याच्या आईला आजही आहे. दि. ३० जुलै रोजी माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. सकाळी आठच्या सुमारास पाणी, माती व दगड धोंड्यांचा ढिगारा घरावर आला. हे घर एका बाजूला असल्यामुळे मोठा ढिगारा या घरावर पडला नाही. काही कळायचा आत घराचे छप्पर रुद्र व त्याची आई प्रमिला हिच्या अंगावर पडले. मातीच्या ढिगाऱ्यात घर गाडले गेल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. डोंगरावर राहणाऱ्या पसारवाडी, लेंभेवाडी, पोटेवाडी या माळीणच्या वाड्यावस्त्यांमध्ये बातमी पोहोचली. यातील काही ग्रामस्थ माळीणकडे आले. येथे पोहोचल्यानंतर माळीणवर पडलेला ढिगारा पाहत असतानाच अपुऱ्या पडक्या घरातून रडण्याचा त्यांना आवाज आला. लगेच ग्रामस्थांनी व मदत कार्यासाठी आलेल्या मुलांनी घराकडे धाव घेतली व यातून रुद्र, त्याची आई प्रमिला व आजी-आजोबांना सुखरूप बाहेर काढले. ताबडतोब त्यांना मंचर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या दुर्घटनेच्या आठवणींबाबत प्रमिला मच्छिंद्र लेंभे यांच्याशी चर्चा केली असता, रुद्र आता एक वर्ष तीन महिन्यांचा झाला आहे. पोरगं नशिबवान होतं म्हणून आम्ही वाचलो. आमच्या अंगावर छत नसते पडले, तर आम्हीही गेलो असतो. पोरगं रडलं म्हणून ढिगाऱ्याजवळ आलेल्या वाडीच्या लोकांनी आम्हाला काढलं. रुद्रचे वडील पुण्याला होते व आम्ही सगळे घरी. या दुर्घटनेत आमच्या घरातील सगळे थोडक्यात वाचले, पण नातेवाई व गावकरी गेल्याचे अजूनही दु:ख होते. रुद्रला कल्याण येथील दहीहंडी मंडळाने एक लाख व शासनाने ९ हजार रुपये दिले. (वार्ताहर)