शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

बायपासला आमचा विरोध आहे, सरळ रस्त्याला नाही!

By admin | Updated: June 27, 2015 03:33 IST

पुणे-नाशिक महामार्गाच्या बायपासला आमचा विरोध आहे सरळ रस्त्याला नाही, अशी भूमिका आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली,

घोडेगाव : पुणे-नाशिक महामार्गाच्या बायपासला आमचा विरोध आहे सरळ रस्त्याला नाही, अशी भूमिका आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली, तर बाह्यवळण रद्द करणे आमच्या पातळीवर होणार नाही, ठरल्याप्रमाणे मोजणी होईल याला कोणी विरोध करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, अशी भूमिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.घोडेगाव येथे तहसील कचेरीत आंबेगाव तालुक्यातून गेलेल्या महामार्गाच्या भूसंपादनाबाबत महसूल अधिकारी, शेतकरी व रस्ता तयार करीत असलेल्या केएसईएल या कंपनीचे अधिकारी यांची बैठक झाली. या वेळी शेतकऱ्यांनी बाह्यवळणास कडाडून विरोध केला. रस्ता करण्यासाठी जागामालकांनी वेगवेगळे अनेक बदल सुचवले. या बदलांप्रमाणे रस्ता करा व शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, अशी भूमिका मांडली. या वेळी उपजिल्हाधिकारी संजय पाटील, प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, डी. एस. झोडगे, बी. जी. गोरे, एमएसईएल कंपनीचे व्यवस्थापक एस. पी. सिंग, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे आदी अधिकारी व एकलहरेचे सरपंच संतोष डोके, डॉ. सुहास कहडणे, आशीष काळजे, धीरज समदडिया, अ‍ॅड. मुकुंद काळे आदी उपस्थित होते. प्रशासनाची भूमिका लोकांना समजावी, यासाठी ही बैठक लावण्यात आली आहे. बाह्यवळण रद्द करणे आमच्या पातळीवर होणार नाही. ठरल्याप्रमाणे मोजणी होईल याला कोणी विरोध करू नका. बाह्यवळण रद्दरण्यासाठी वरच्या पातळीवर शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागतील. आम्ही काहीही करू शकत नाही, असे संजय पाटील यांनी सांगितले.याबाबत बोलताना जागामालक डॉ. सुहास कहडणे म्हणाले, की आमचा विरोध रस्त्याला नाही तर बाहयवळणाला आहे. बाहयवळणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे विचारात घेऊन रस्ता केला जावा. तसेच आज बोलावलेली बैठक अधिकृत नसून याच्या नोटिसा जमीनमालकांना पाठविलेल्या नाहीत. फक्त कळंब गावातील फळ््यावर याची सूचना लिहिलेली होती. प्रशासन जमीनमालकांबरोबर घेतलेली बैठक दाखवून आमच्यावर निर्णय लादू पाहत आहे. आमचा जमिनी देण्यास विरोध असून आमच्या जमिनीची मोजणी करू नये, असे झाल्यास आम्ही मोजणीला विरोध करू, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)