"आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं! तेव्हा त्यांनी आम्हाला मंत्री केलं, त्यांनी काही उपकार नाही केले" - महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:56 PM2023-08-29T12:56:07+5:302023-08-29T12:56:35+5:30

सध्या राजकारणात शिवसेनेत सासरा, बीजेपीमध्ये जावई, राष्ट्रवादीत मेव्हणा तर काँग्रसमध्ये साडू असतो

We made him Chief Minister Then he made us Minister he did us no favours Mahadev Jankar | "आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं! तेव्हा त्यांनी आम्हाला मंत्री केलं, त्यांनी काही उपकार नाही केले" - महादेव जानकर

"आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं! तेव्हा त्यांनी आम्हाला मंत्री केलं, त्यांनी काही उपकार नाही केले" - महादेव जानकर

googlenewsNext

नीरा : महाराष्ट्राची जनता गोंधळलेल्या अवस्थेत आहे. सत्ताधारी व विरोधक वेगळ्या भूमिका घेत असेल तर सामान्य जनतेने स्वतःच समाजकारण राजकारण कस करावं हे ठरवावं. मोठा मासा लहान माशांना खातो. भाजप आणि काँग्रेसला वेगळं समाजात नाही. रासपनेच ठरवलय मोठा मासा व्हायचं. आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं तेव्हा त्यांनी आम्हाला मंत्री केलं त्यांनी काही उपकार नाही केलं" असं मत माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रीय समाज पक्षाची 'जनस्वराज यात्रा' सुरू आहे. यादरम्यान जानकर निरेत माध्यमांशी बोलत होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथून सोमवारी ही यात्रा सुरु झाली आहे. रात्री उशिरा पुरंदर तालुक्यातील नीरा येथे तालुका अध्यक्ष संजय निगडे यांनी नीरेतील बुवासाहेब चौकात यात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले. यावेळी रासपचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्यमहासचिव ज्ञानेश्वर सलगर, सुशिल कुमार, बाळकृष्ण लेंगरे, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, पुणे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, निलेश लांडगे, बाप्पूसाहेब मदने आदी उपस्थित होते. 

घराणे शाहीवर जाणकरांनी हल्ला बोल करत, सध्या राजकारणात शिवसेनेत सासरा, बीजेपीमध्ये जावई, राष्ट्रवादीत मेव्हणा तर काँग्रसमध्ये साडू असतो. जनतेने मत गावात विकलं नाही पाहिजे. चांगल्या चारित्र्याचा नेता बघून लोकांनी त्याला निवडून द्यायला पाहिजे. बारामतीकरांची ही गुगली असू शकते. एक म्हणतोय माझा नेता, दुसरा म्हणतोय माझा नेता. जनतेने यावर अभ्यास करावा. जानकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा लढवणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. रयतेचे, बळी राजाचं राज्य यावं यासाठी ही जनस्वराज्या यात्रा असल्याचे महादेव जानकर म्हणाले. 

Web Title: We made him Chief Minister Then he made us Minister he did us no favours Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.