फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही, सगळीकडे साथ हवी - अजित पवार

By राजू हिंगे | Published: March 27, 2024 08:18 PM2024-03-27T20:18:02+5:302024-03-27T20:19:16+5:30

शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे

We have not come to do Baramati only we need support everywhere Ajit Pawar | फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही, सगळीकडे साथ हवी - अजित पवार

फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही, सगळीकडे साथ हवी - अजित पवार

पुणे : मी काय फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे. काही लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. फोन करती पण त्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका. महाराष्ट्र केसरीतील वाद मिटवावा असं मला वाटतंय. खेळात वाद नको असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीराचा स्नेह मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर, बाबा कंधारे, पंकज हरकुडे, अप्पा रेणुसे, दत्ता सागरे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांतून पहिलवान आले आहेत. त्या सर्वांचे मी स्वागत करतो. तुमची शिरुर, पुणे, बारामती, मावळ यासह ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असणार आहेत त्या सर्वांना सहकार्य करा, तुम्ही आशीर्वाद द्या,आम्ही तुम्हाला निश्चित सहकार्य केले जाईल. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जसा कोल्हापूरच्या तालीम संघाचा विकास आराखडा आहे. तसा आराखडा तयार करण्यात येईल. पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात कुलगुलगुरूंची नेमणूक केलेली आहे असे पवार यांनी सांगितले.

देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक

लोकांनी अनेकदा आम्हाला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे . ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रीडा क्षेत्रासाठी मी काम केलं आहे,कुठलीही अडचण येऊ दिली नाही. महायुतीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. महाराष्ट्रचा सर्वांगिक विकास कसा होईल हे बघतोय असेही अजित पवार यांनी सांगितले.

देशाची राज्यघटना बदलतील असं काहीही होणार नाही

लोकशाहीत कुणी कुणाचं काम करायचं. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण देश आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. मात्र काही लोकं गैरसमज पसरवत आहेत. जर 2024 मध्ये मोदी सरकार आलं तर ते देशाची राज्यघटना बदलतील असं काहीही म्हटलं जातंय. पण तसं काहीही होणार नाही असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Web Title: We have not come to do Baramati only we need support everywhere Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.