शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

आम्ही ‘ पुणेकर ’ निर्दोष ! घटलेल्या मतदानाला '' ते'' च जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 13:19 IST

पुणेकर मतदानाला उत्साहाने बाहेर पडले नाहीत, याचे कारण उमेदवारांबद्दल पुुणेकरांमध्ये असलेली नापसंती हे असू शकते.

ठळक मुद्देमतदारांना उत्साह वाटावे, अशी वातावरण निर्मिती राजकीय पक्ष, उमेदवार करु शकले नाहीतमतदान कमी होण्यामागे अनेक कारणे मतदानावरुन पुणेकरांना कोणी आव्हान देऊ शकत नाही. पुणेकरांचे कर्तृत्व अबाधितमतदान कमी झाले, हे खरे असले तरी नेमके उत्तर शोधायला हवेमतदारयाद्यांमधील घोळ हे मतदान कमी होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण

पुणे : मतदानाची पुण्यातली टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा घसरली याचा दोष पुणेकरांचा नसून खासदार होऊ पाहणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचा असल्याची प्रतिक्रिया पुणेकरांमधून व्यक्त झाली. पुणेकर मतदानाला उत्साहाने बाहेर पडले नाहीत, याचे कारण उमेदवारांबद्दल पुुणेकरांमध्ये असलेली नापसंती हे असू शकते. प्रचारामध्ये चुरस नसल्यानेही पुणेकरांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली असेल, असे सांगण्यात येत आहे. 

काही पुणेरी प्रतिक्रियापुणेकरांना दोष देणे चुकीचे ‘‘मतदान कमी झाल्याने आभाळ कोसळले, असे मानण्याचे कारण नाही. नुकत्याच परीक्षा संपल्याने सुट्ट्यांचा काळ आहे. अनेक दुबार, स्थलांतरीत, मयत लोकांची सुमारे १० टक्के नावे मतदार यादीत असल्याने मुळातच मतदारसंख्या जास्त दिसते. महत्त्वाचे म्हणजे मतदारांना उत्साह वाटावे, अशी वातावरण निर्मिती राजकीय पक्ष, उमेदवार करु शकले नाहीत. तरीही ५० टक्के पुणेकर स्वत:हून मतदानाला बाहेर पडले, ही चांगली बाब आहे.’’-ज्येष्ठ राजकीय नेते अंकुश काकडे, नवी पेठ, दोन पिढ्यांचे पुणेकर. 

पुणेकरांना आव्हान देऊ नये‘‘पुणेकरांचे मतदान कमी पडले, ही वस्तुस्थिती आहे. अधिक मतदान झाले असते तर मला ते आवडले असते. पण मतदान कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार मतदारांपर्यंत पोचले नाहीत. प्रचारात चुरस नव्हती. त्यामुळे घसरलेल्या मतदानावरुन पुणेकरांना कोणी आव्हान देऊ शकत नाही. पुणेकरांचे कर्तृत्व अबाधित आहे.’’-पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, लोकमाान्य नगर, दोन पिढ्यांचे पुणेकर. दोष राजकीय पक्षांचा‘‘उमेदवारांबद्दलचा भ्रमनिरास, उमेदवारांबद्दलची नाराजी यामुळे मतदार घरी बसले. त्यामुळे मतदानाचा घसरलेला टक्का हे पुणेकरांचे अपयश नसून राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे आहे. निवडणुकीत चुरस निर्माण झाली तरच मतदारांमध्ये उत्साह दिसतो. त्यामुळे आत्मपरिक्षण पुणेकरांनी नव्हे तर राजकारण्यांनी करावे.’’-राजकीय नेते अजय शिंदे, सदाशिव पेठ, दोन पिढ्यांचे पुणेकर.

अस्सल पुणेकरच कमी झाले‘‘मतदान कमी झाले, हे खरे असले तरी नेमके उत्तर शोधायला हवे. मतदान न करणा-यांमध्ये अस्सल पुणेकर किती आणि बाहेरुन पुण्यात स्थायिक झालेले किती, याबाबत नेमका अंदाज येणे अवघड आहे. पुण्यात अस्सल पुणेकरांचा टक्का घसरल्याने मतदानाचाही टक्का घसरला आहे.’’-व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित, कोथरूड, तीन पिढ्यांचे पुणेकर

‘लाल फिती’ला वैतागले पुणेकर‘‘मतदारयाद्यांमधील घोळ हे मतदान कमी होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण आहे. अनेक नागरिक मतदान केंद्रांपर्यंत गेले. मात्र, खूप प्रयत्न करुनही त्यांना यादीत नावेच सापडली नाहीत. याआधी अनेकदा मतदान करुनही अचानक यादीतून नावे गायब झाली. सत्ता कोणाचीही असली तरी प्रशासनातील अनास्था कायम आहे. तीन-चार वेळा दुरुस्तीसाठी अथवा बदलासाठी अर्ज करुनही यादीत बदल झालेले नाहीत. हुज्जत घालूनही नावे न मिळाल्याने नागरिक वैैतागले. त्यामुळे पुणेकर घराबाहेर पडलेच नाहीत, असे म्हणता येत नाही.-लेखक-दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे, सिंहगड रस्ता, दोन पिढ्यांचे पुणेकर

चौकटपुण्याचा इतिहाससन १९६७ मध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. त्या वर्षी झालेले ६९.६४ टक्के मतदान हे पुण्यातले आजवरचे सर्वोच्च होय. तर पुण्याच्या इतिहासातील सर्वात कमी मतदान सन २००९ मध्ये ४०.६६ इतके झाले. त्यावर्षी सुरेश कलमाडी कॉंग्रेसकडून विजयी झाले. दरम्यान, गेल्या सलग पाच लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यातल्या मतदानाची टक्केवारी ५५ च्या पुढे गेलेली नाही.   

चौकटसोशल मीडियातली शेलकी शेरेबाजी-‘पुणे मतदानात उणे’-‘पुणेकरांनी इतरांना शहाणपणा शिकवणाच्या जन्मजात हक्काबाबत शंका निर्माण केल्या आहेत’-‘पुणेकर १ ते ४ झोपले की काय?’-‘पुस्तक दिनी पुणेकर वाचनात इतके रमले की मतदान करायला विसरले’-ज्यांना स्वत:चे मत असते तेच देतात-दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याची टक्केवारी १००; मतदानाची मात्र ५० च.

 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानBJPभाजपाcongressकाँग्रेस