शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कितीही तोडा, जोडा, आम्ही लढायला तयार; प्रभाग रचनेच्या फेरबदलावरून मनसेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:27 IST

प्रभाग रचना तीनची होती आता चारची केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर महापौराची निवडही जनतेतून करावी असं आव्हान मनसे नेते वसंत मोरे यांनी केले.

पुणे - सरकारने पुन्हा एकदा प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला. आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलले परंतु प्रभाग रचना बदलण्याचं कारण काय? स्वत:च्या स्वार्थासाठी निर्णय घेतले जात आहेत. राजकारणाची चीड यायला लागली आहे. हिंमत असेल निवडणुकांना सामोरे जा. प्रत्येकजण आपापल्या परिने प्रभाग रचना बदलतोय. कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार आहे. कात्रज मनसेचाच बालेकिल्ला असणार. पुण्यात मनसेचा महापौर बनणार असा दावा मनसे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. 

वसंत मोरे म्हणाले की, प्रभाग रचना तीनची होती आता चारची केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर महापौराची निवडही जनतेतून करावी. मग जनतेची काळजी आहे हे म्हणता येईल. मग महापौर कुणाचा हे कळेल. २०१७ ला भाजपाच्या फायद्याची प्रभाग रचना झाली. त्यानंतर मविआने त्यांच्या फायद्याची प्रभाग रचना केली. आता पुन्हा प्रभाग रचना बदलली. पक्षाचा सर्वांगिण विकास, आमदार-खासदारांचा विकास याकडेच राजकीय पक्षाचे लक्ष आहे. जनतेच्या प्रश्नाकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आता यांचा गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. जनतेनेही आता याकडे लक्ष द्यायला हवं. जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देणे गरजेचे आहे असं मोरेंनी सांगितले. 

कात्रजचं नाव बदनाम करण्याचा प्रकार   कात्रजमध्ये शिवसैनिकांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केला. उदय सामंत यांचा मार्ग हा नव्हता मग ते याठिकाणाहून कसे गेले? ३०७ सारखा भयंकर गुन्हा स्वत: वकील असलेले शिवसेना नेते संभाजी थोरवे करणं अवघड आहे. शिवसैनिक आक्रमक झाल्याचं क्लिपमध्ये दिसतं. परंतु दोन गाड्यातून लोक उतरले. हत्यारं काढली. परंतु हा महाराष्ट्र आहे. इतकी अराजकता राज्यात आहे वाटत नाही. शिवसैनिकांची गर्दी इतकी नव्हती. काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. विकास म्हटलं तर कात्रज नाव घेतले जाते. परंतु गेल्या २-३ दिवसांपासून कात्रजच्या नावाला बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे अशा शब्दात वसंत मोरे यांनी उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :MNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना