शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही आमचे काम करतोय, महायुतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ - अजित पवार

By नितीन चौधरी | Updated: June 9, 2025 19:37 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून की स्वबळावर लढणार याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवत अजित पवारांनी संभ्रम कायम ठेवला

पुणे : चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने काम करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही देखील आपले काम करत राहण्याचे ठरवले आहे. योग्य वेळ आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, अशा शब्दांत महायुतीत लढायचे की, स्वबळावर याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवत अजित पवार यांनी संभ्रम कायम ठेवला आहे. महापालिका निवडणुकांसाठी माझा चेहरा असेल असे बोलल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी असे बोलावे लागते, असे ते म्हणाले.

व्हीएसआयमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मंगळवारी (दि. १०) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार नेमके काय बोलतील याबाबत उत्सुकता होती. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आमचे नेते व मी चर्चा करून योग्य भूमिका मांडू, असे ते म्हणाले. महायुतीमधील काही सहकारी, कधी एकत्र निवडणुका लढवू तर कधी स्वबळावर निवडणुका लढवू, असे वक्तव्य करत आहेत. मात्र, याचा अंतिम निर्णय प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा आहे. मात्र, कुणाचे काय ठरेल, निवडणुका कधी होणार, कोण कुठे जाणार, हे त्या-त्या वेळी सांगितले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या दोन्ही पक्षांचे प्रथमच पुण्यात वर्धापन दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. याबाबत विचारले असता स्वतंत्र वर्धापन दिनावर या दोन्ही पक्षांचा दावा खरा आहे, असे सांगत पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबत मला काही बोलायचे नाही. काय निर्णय घ्यायचे ते त्या-त्या पक्षाचे नेते ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.

उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याबाबत ते दोघेच ठरवतील आणि जाहीरही करतील, असे सांगून पक्षाचे समर्थक पाठीराखे हितचिंतक यांना वाटते तसे बोलून दाखवले जाते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही गट एकत्र येतील याबाबतही तसेच सुरू झाले असून, एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारणे तुमचा अधिकार असला, तरी उत्तर देणे माझा अधिकार आहे. आता याबाबत उत्तर द्यायचे नाही, असे मी ठरविले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी अशा बातम्या दिल्या जातात, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिका