पुणे : शहरात ब्राह्मण मतदारांची संख्या सुमारे १६ ते १८ टक्के इतकी असतानाही राजकीय पक्षांकडून सातत्याने ब्राह्मण उमेदवारांना डावलले जात असल्याची भावना समाजात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजाला योग्य व पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने बुधवारी (दि.२४) करण्यात आले. या वेळी समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, सह-समन्वयक अॅड. ईशानी जोशी, प्रवक्ते विश्वजीत देशपांडे, राजकीय समितीचे सदस्य विश्वनाथ भालेराव, मंदार रेडे, सुनील पारखी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ब्राह्मण समाजातील सुमारे ५० कार्यकर्ते निवडून आले आहेत. एकट्या मराठवाड्यात पाच ठिकाणी ब्राह्मण नगराध्यक्ष निवडून आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच कोकण, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने ब्राह्मण उमेदवारांना मतदारांनी संधी दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवून चांगला प्रतिसाद मिळविला होता. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्येही असेच परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी ब्राह्मण बहुल प्रभागांमध्ये ब्राह्मण उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी आग्रहाची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच तिकीट द्यावे व ‘बी’ प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सुमारे ३० संभाव्य उमेदवारांची यादीही दिली आहे. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तसेच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनाही याबाबत आवाहन करण्यात आले असून, काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील नेत्यांचीही लवकरच भेट घेण्यात येणार आहे.
Web Summary : Pune's Brahmin community, feeling underrepresented, urges all political parties to prioritize Brahmin candidates in the upcoming PMC elections, especially in Brahmin-majority areas. They've submitted a list of potential candidates and seek fair representation across parties.
Web Summary : पुणे के ब्राह्मण समुदाय ने, कम प्रतिनिधित्व महसूस करते हुए, आगामी पीएमसी चुनावों में ब्राह्मण उम्मीदवारों को प्राथमिकता देने का आग्रह किया, विशेष रूप से ब्राह्मण-बहुल क्षेत्रों में। उन्होंने संभावित उम्मीदवारों की एक सूची सौंपी है और पार्टियों में उचित प्रतिनिधित्व चाहते हैं।