शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतोच, पण याचा अर्थ कुणाच्या भावना दुखावणे असा होत नाही..! "

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 15:25 IST

शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वापरलेले शब्द चुकीचे होते.

पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांनी हिंदू समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना प्रक्षोभक भाषण केले होते. हिंदू समाजाचा अवमान केल्याप्रकरणी उस्मानी याच्यावर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने भाजपने आक्रमक पावित्रा घेत राज्य सरकार व गृहमंत्री यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी पुण्यात शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील शरजील उस्मानी याला खडे बोल सुनावले आहे. 

पुण्यात छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले, शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वापरलेले शब्द चुकीचे होते. आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतो. पण याचा अर्थ कोणाच्या भावना दुखावणे असा होत नाही. 

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांच्या भेटीवर छगन भुजबळ म्हणाले..... काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यात बंद दरवाजाआड एक तास चर्चा झाली. बाहेर पडल्यावर मुनगंटीवार यांनी ही भेट मतदारसंघातील विविध विकास कामासंबंधी असल्याचे स्पष्ट केले असले तरी राजकीय वर्तुळात या भेटीवरून अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. याबाबत भाष्य करताना भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांना कोणीही भेटु शकते. मुनगंटीवार भेटु शकतात, फडणवीस भेटू शकतात. मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का म्हणून असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. 

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद याबाबत चर्चाच आहे. पण याबाबत ज्यावेळी चर्चा थांबेल तेव्हाच खरे ते काय बाहेर येईल. 

धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले,  मुंडे यांच्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आलीय. पण या आधी देखील जी तक्रार देण्यात आली होती ती पुन्हा मागे घेण्यात आली. त्या महिलेच्या विरोधातच अनेकांनी तक्रारी दिल्या . 

टॅग्स :PuneपुणेChagan Bhujbalछगन भुजबळPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकारAnil Deshmukhअनिल देशमुख