शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सरकार माफियागिरी करतंय. वसुली साठी सचिन वझेना परत आणलं किरीट सोमैया यांचा आरोप .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:45 PM

शरद पवारांनी वाझेंची हकालपट्टी का केली होती विचारला सवाल. गृहमंत्र्यांची मात्र चूक नसल्याचा दावा

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात लसीकरण केंद्रास  भेट

उद्धव ठाकरेंना वसुली साठी माणूस हवा होता, 50 कोटींची वसुली करणारा जुना शिवसैनिक हवा होता म्हणून वाझेना परत आणलं गेलं असा आरोप  भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. या प्रकरणात सेनेवर तोफ डागतानाच या प्रकरणी गृहमंत्र्यांचा हलगर्जी पणा नसल्याचं ही सोमैया म्हणाले आहेत..दरम्यान राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना का निलंबित केले होते असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वाझे हा राज्य सरकार चा विशेष माणूस असल्याचे दिसत आहे असाही आरोप सोमैया`यांनी केला . 

सोमैया म्हणाले , " प्रकरणात साध्या एक एपीआय साठी उद्धव ठाकरे कमिटी तयार करतात. ६ जूनला त्याचे निलंबन रद्द केलं. शरद पवारांनी गृहमंत्री असताना त्यांना निलंबित का केलं होत. त्यानंतर २००७ मध्ये राष्ट्रवादीचे गृहमंत्री त्यांचा राजीनामाही स्वीकारत नाहीत. वाझे प्रकरणात आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी दिसत आहे. त्यामुळे वाझे हा राज्य सरकारचा विशेष माणूस असल्याचे सिद्ध होत आहे. असा आरोप किरीट सोमैय्या यांनी राज्य सरकारवर केला आहे"

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमैया यांनी ससून रुग्णालयात लसीकरण केंद्रास  भेट दिली . यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.सोमैय्या म्हणाले,  "आताचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना काय दिसले  की त्यांनी वाझेंना परत घेतलं? शरद पवारांनी त्यांना निलंबित केलं होतं. मग आता हे का परत घेत आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचा हलगर्जीपणा नाही  तर उद्धव ठाकरेंना वसुली करायला माणूस हवा आहे. सरकार माफियागिरी करतंय. असा टोलाही त्यांनी यावेळी बजावला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेला  उत्तर द्यावे असंही सोमैया म्हणाले. 

एखादा एपीआय क्राईम ब्रांच ची गाडी घेऊन फिरतो यावरूनच वझे हा सरकार चा महत्वाचा माणूस आहे हे सिद्ध होते आहे असाही आरोप सोमैयानी केला. दरम्यान पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांची हकालपट्टी झाली असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाGovernmentसरकार