सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र

By किरण शिंदे | Updated: May 27, 2025 16:04 IST2025-05-27T16:03:17+5:302025-05-27T16:04:47+5:30

लोकमतच्या प्रतिनिधीने देखील या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचं स्पष्ट झालं

Wave of anger among the common people! Women's Commission's helpline number is completely 'closed', MNS writes a letter directly to Fadnavis | सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र

सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणात महिला आयोगाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला. याच पार्श्वभूमीवर महिलांना तातडीची मदत मिळावी यासाठी कार्यरत असलेले महिला आयोगाचे संपर्क क्रमांक सध्या बंद असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महिला आयोगाचे अधिकृत संपर्क क्रमांक – (022) 26592707 आणि हेल्पलाईन नंबर 155209 हे दोन क्रमांक आहेत. सध्या त्यापैकी संपर्क क्रमांक बंद असल्याचं स्पष्ट झालं आहे. "डझ नॉट एक्झिस्ट" असा मेसेज या नंबरवर कॉल केल्यावर ऐकायला मिळतो. "फोनवर महिला आयोगच Dose Not Exist" असा थेट अनुभव अनेकांनी घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधलं आहे. सामान्य महिलांना संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी कोणाकडे जायचं? सरकारी यंत्रणा अस्तित्वात असताना जर संपर्कच होत नसेल, तर त्या यंत्रणेचं अर्थ काय?" असा प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. लोकमतच्या प्रतिनिधीने देखील या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचं स्पष्ट झालं. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप महिला आयोगाने किंवा सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र मनसेकडून थेट मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवल्यामुळे आता याकडे गांभीर्याने पाहिलं जाईल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Wave of anger among the common people! Women's Commission's helpline number is completely 'closed', MNS writes a letter directly to Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.