शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यातील १३ गावांत टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:57 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळातून शेतकरी पूर्णत: होरपळला आहे.

हिवाळा संपायच्या आताच बारामती तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात दुष्काळाची तीव्रता केवळ शेतीपर्यंत नव्हे, तर पिण्याच्या पाण्यापर्यंत प्रचंड जाणवणार आहे. तीव्र दुष्काळामुळे तालुक्यातील केवळ ४१.१८ टक्के रब्बी पेरण्या झाल्या होत्या. यामध्ये बहुतांश ठिकाणी ती संपूर्ण लागवड जळाल्याने महसूल प्रशासनाने तालुक्यातील ६५ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. तालुक्यात सध्या केवळ बारामती मंडळ, वडगाव निंबाळकर मंडळ कार्यक्षेत्रात चारा उपलब्धता आहे. याशिवाय माळेगाव, सुपा, मोरगाव, लोणी, उंडवडी मंडळ कार्यक्षेत्रात सध्या भीषण चाराटंचाई आहे. या ठिकाणी चाºयाची गरज असल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाºयांना पाठविला आहे.

पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या आक डेवारीनुसार तालुुक्यात ६६ गावांमध्ये तीव्र चाराटंचाई आहे. तालुक्यात एकूण ६० हजार ९० लहान-मोठी जनावरे आहेत. तर ८५ हजार ६४७ शेळ्या-मेंढ्या आहेत. मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो चारा, लहान जनावरांना ७ किलो प्रतिदिन चाºयाची गरज भासते. या हिशोबानुसार जवळपास ७८२.५१३ मेट्रिक टन चाºयाची जनावरांना गरज आहे. जनावरांसाठी २० लाख ४३ हजार ३१० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाला या गरजांची पूर्तता करण्याचे आव्हान पेलावेच लागणार आहे.जिरायती भागातील ८० टक्के शेतकरी दूध व्यवसाय करतात. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय जिरायती भागात मात्र शेतकºयांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे. जनावरांसाठी चारा महागला आहे. गेल्या अनेक वर्षांत पाणी आणि चाराटंचाईचे चटके शेतकरी अनुभवत आहेत. सध्या साखर कारखाने सुरू असल्याने उसाचे वाढे जनावरांच्या चाºयासाठी शेतकरी विकत आणत आहेत. त्यातच वाढ्याचे दरदेखील दीडपटीने वाढलेले आहेत. हा चारादेखील साखर कारखान्यांचा गळीत हंगामाबरोबरच संपुष्टात येणार आहे. चारशे रुपये प्रतिशेकडा दराने विकले जाणारे वाढे शेतकरी ६०० रुपये शेकडा दराने नाईलाजाने विकत घेत आहेत. शेतात काही पिकलेच नसल्याने जनावरांना चारा विकत घ्यावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जनावरे जगविण्यासाठी सर्वसामान्य शेतकºयांना चारा विकत घेण्याची गेल्या तीन महिन्यांपासून वेळ आली आहे. उसामध्ये अन्नद्रव्याची असलेली कमतरता व केवळ जनावरांचे पोट भरण्यासाठी होत असलेला वापर यामुळे दुग्ध उत्पादनात घट होऊ लागली आहे. परिमाणी दुष्काळी स्थितीत उपजीविकेचा आधार असणाºया दुग्ध व्यवसायावर चाराटंचाईचे संकट घोंगावत आहे. जिरायती भागात तातडीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे.शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. रोहयोअंतर्गत तरुणांना रोजगार उपलब्ध करावा, शेतीपंपाच्या वीजबिलात ३३.५० टक्के सूट द्यावी, शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती द्यावी,जमीन महसुलात सूट देण्याची मागणी येथील राजकीय पक्षांच्या वतीने देखील करण्यात आली आहे.

नाझरे धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. या धरणातून बारामती तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या नाझरेमध्ये केवळ एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यानंतर या गावात दुष्काळाचे चटके आणखी तीव्र होणार आहेत. जानाई शिरसाईच्या पाणी तलावात सोडण्याच्या मागणीसाठी बारामती तालुक्यातील उंडवडी क.प. येथील शेतकºयांना पाच दिवस आमरण उपोषण केले.पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून पाणी सोडण्याचे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. शेतकºयांना जानाई शिरसाईच्या पाण्याची मोठी गरज आहे. तालुक्याच्या जिरायती भागात ठिकठिकाणी चारा छावण्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, या मागण्यांचे मुख्यमंत्र्यांकडे बारामतीच्या सामाजिक संघटनांनी साकडे घातले आहे.बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळातून शेतकरी पूर्णत: होरपळला आहे. खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकºयांच्या हाती कोणतेही पीक लागले नाही. परिणाम तालुक्यातील शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुष्काळातील शेतकºयांना दूधधंद्याचाच आधार उरला आहे. मात्र,जनावरांसाठी चाºयाचा तुटवडा जाणवू लागला आहे. १३ गावे, १५१ वाड्यावस्त्यांवरील ३५ हजार ३८६ लोकसंख्येला १७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी ७ गावांसाठी टँकर प्रस्तावित आहेत. जिरायती भागात यंदा १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळ जाणवत आहे. नाले, तलाव, ओढे, विहिरी कोरडे पडले आहेत.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे