Pune Water Supply: शहरातील कल्याणीनगर ,कळस भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

By राजू हिंगे | Published: February 26, 2024 05:03 PM2024-02-26T17:03:12+5:302024-02-26T17:03:46+5:30

शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता

Water supply to Kalyaninagar Kalas area of the city stopped on Thursday | Pune Water Supply: शहरातील कल्याणीनगर ,कळस भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Pune Water Supply: शहरातील कल्याणीनगर ,कळस भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणे : भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे व ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे आहे . त्यामुळे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा गुरुवारी  दि.२९ बंद राहणार आहे.   या सर्व  भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग  पुढील प्रमाणे 

आदर्शनगर , कल्याणीनगर , हरीनगर , रामवाडी , शास्त्रीनगर,संपूर्ण गणेशनगर  म्हस्के वस्ती परिसर ,कळस ,माळवाडी ,जाधव वस्ती ,विशाल परिसर , विश्रांतवाडी स. नं. ११२ अ ,कस्तुरबा , टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक , जयजवान नगर , जय प्रकाशनगर ,संजय पार्क ,एयर पोर्ट ,यमुना नगर ,दिनकर पठारे वस्ती ,पराशर सोसायटी , श्री. पार्क , ठुबे पठारे नगर

Web Title: Water supply to Kalyaninagar Kalas area of the city stopped on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.