शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला नळचोरांचा झटका; नळ बसविण्याचा खर्च सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:18 IST

रेल्वेने चांगल्या सुविधा देऊनही काही प्रवाशांकडूनच त्याला ठेंगा दाखविला जात असल्याचे समोर आले आहे..

ठळक मुद्देदोन गाड्यांमधील तब्बल ३ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरीला डब्ब्यांमधील स्वच्छतेसह दिवे, पंखे, एसी, स्वच्छतागृहातील देखभाल याकडे प्राधान्याने लक्ष

पुणे : रेल्वेमध्ये चांगल्या सुविधा सुविधा मिळत नसल्याची ओरड अनेक प्रवासी करतात. बंद पंखे, एसी, दिवे यांसह खराब आसने, ब्लँकेट, अस्वच्छता अशा विविध कारणांसाठी रेल्वेच्या कामकाजावर बोट ठेवले जाते. पण रेल्वेने चांगल्या सुविधा देऊनही काही प्रवाशांकडूनच त्याला ठेंगा दाखविला जात असल्याचे समोर आले आहे. पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस व मुंबई-गडग एक्सप्रेस या दोन गाड्यांमधील तब्बल ३ लाख रुपये किंमतीचे ब्रँडेड नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. हे नळ बसविण्याची मजुरी व इतर खर्च धरल्यास हा आकडा सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या नळचोर प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनही गोंधळून गेले आहे.प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. डब्ब्यांमधील स्वच्छतेसह दिवे, पंखे, एसी, स्वच्छतागृहातील देखभाल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तत्परतेने अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अनेक गाड्यांचे रुपडेही पालटले जात आहे. मध्य रेल्वेकडून काही महिन्यांपूर्वीच डेक्कन एक्सप्रेसला नवी झळाळी दिली. गाडीमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा दिल्या आहेत. त्यामध्ये स्वच्छतागृहात ब्रँडेड कंपन्यांचे नळ व इतर साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यापासून आतापर्यंत जवळपास १०० हून अधिक नळ व इतर साहित्य प्रवाशांनी चोरले आहे. असाच प्रकार मुंबई-गडग (कर्नाटक) एक्सप्रेसमध्येही घडला आहे. या गाडीला ७० वस्तु चोरीला गेल्या आहेत. रेल्वेच्या उत्कृष्ट प्रकल्पाअंतर्गत मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा दिल्या जात आहेत. डब्यांमधील सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत. त्यानुसार मुंबई विभागाकडून गडग व डेक्कन एक्सप्रेसचा चेहरा मोहरा बदलला आहे. प्रत्येक डब्यासाठी सुमारे ६० लाखांचा खर्च केला आहे. प्रवाशांना गरजा ओळखून हे बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. पण काही प्रवाशांकडून नळासह विविध साहित्याची चोरी होत असल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच झटका बसत आहे. शेवटच्या थांब्यावर गाडी रिकामी झाल्यानंतर चोरीचे प्रकार घडत असावेत, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ................डेक्कन एक्सप्रेसमधील डब्ब्यांच्या स्वच्छतागृहात प्रसिध्द ब्रॅण्डचे २४० नळ व इतर साहित्य बसविले होते. त्यापैकी ९९ नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. तर गडग एक्सप्रेस १६० पैकी ७० नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. यामधील एक नळ व इतर साहित्याची किंमत प्रत्येकी १४०० ते २८०० एवढी आहे. त्यामुळे चोरीमुळे तब्बल ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेThiefचोर