शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

कालवा दुरूस्तीपर्यंत पाणी पुरवठा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 19:59 IST

दांडेकर पुलाजवळील कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तसेच लाखो लिटर पाणी वाया गेले.

ठळक मुद्देलष्कर,पर्वती भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे दोन दिवसांचा कालावधीकालव्यात पाणी नसल्यामुळे तब्बल ३५० मिलियन लिटर पाण्याचा तुटवडा भासणार

पुणे : खडकवासला कालव्यातून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाणी उचलून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कालवाच फुटल्याने जलशुध्दीकरण केंद्रात पाणी घेता येणे शक्य नाही. त्यामुळे कालव्याची दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून बंद पाईपलाईनमधून पर्वती जलशुध्दीकरण केंद्रात पाणी घेतले जाते. तसेच काही पाणी कालव्यातून उचलले जाते. त्यानंतर लष्कर व पर्वती भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दांडेकर पुलाजवळील कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तसेच लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी गुरूवारी साडेअकराच्या सुमारास बंद करण्यात आले. कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत कालव्यात पाणी सोडले जाणार नाही. परिणामी शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तर काही भागात दोन दिवस पाणीच येवू शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.कालवा फुटल्यामुळे लष्कर भागातील होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ, येरवडा, कोरेगावपार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदननगर, नगररस्ता, विमाननगर आदी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. पर्वती व वडगाव जलकेंद्रच्या कार्यकारी अभियंत्याकडून प्राप्त झालेल्या माहिनीनुसार पर्वती जलशुध्दीकरण केंद्रात कालव्यामधून लष्कर भागासाठी दररोज २५० मिलियन लिटर आणि पर्वती भागासाठी दररोज १०० मिलियन लिटर पाणी घेतले जाते. कालव्यात पाणी नसल्यामुळे तब्बल ३५० मिलियन लिटर पाण्याचा तुटवडा भासणार आहे. परिणामी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.   

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी