शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

‘पिलाणवाडी’तील पाणीसाठा वाढला

By admin | Updated: August 2, 2014 04:22 IST

पिलाणवाडी (ता. पुरंदर) येथील जलाशयातील पाणीसाठा वाढल्याने येथून सुरू असणारी शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या तीन-चार दिवसांत सरू होणार आहे.

खळद : पिलाणवाडी (ता. पुरंदर) येथील जलाशयातील पाणीसाठा वाढल्याने येथून सुरू असणारी शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या तीन-चार दिवसांत सरू होणार आहे. त्यामुळे लाभार्थी गावांतील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण आता थांबणार आहे. मात्र, तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. बहुतांश धरणात क्षमतेच्या ५० टक्केपर्यंतही पाणीसाठा झाला नाही.धरणातील उपयुक्त पाणीसाठा मृत साठ्यापेक्षाही कमी झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून शिवरी प्रादेशिक योजना बंद होती. या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शिवरी, खळद, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डे, बेलसर या गावांतील नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण होत आहे, तर काही गावांत ट्रँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.या भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, पेरण्याही झाल्या नाहीत. भूगर्भातील पाण्याची पातळीही खोलवर गेली असून, बहुतांश विहिरी, बोअरवेल कोरडे पडू लागले आहेत.पिलाणवाडी जलाशय अद्याप भरले नसले नरी किमान पाणी योजना सुरू होईल, एवढा (३८.४८ द.ल.घ.फूट) पाणीसाठा धरणात आला आहे. पाणी योजना नक्की कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापक रोहिदास रासकर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी धरणात पाणीसाठा वाढला असून, तो दोन-तीन दिवसांत स्थिर होईल. तसेच, शिवरी येथील फिल्टर प्लांटमधील वाळू बदलण्याचेही काम सुरू असून, यात नवीन वाळू टाकल्यावर सोमवारपर्यंत ही योजना सुरू होऊ शकते, असे सांगितले. (वार्ताहर)