शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील चारही धरणातील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ टीएमसीने वाढ; आत्तापर्यंत २७.४७ टक्के पाणी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 13:36 IST

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात मिळून आज सकाळपर्यंत ८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असल्याची पाटबंधारे विभागाची माहिती

ठळक मुद्दे शनिवारपासून खडकवासला साखळीतील पावसाचा जोर फार कमी होत गेला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

पुणे: यंदाचा अवकाळी पाऊस आणि मान्सूनच्या जोरदार आगमनाने पुण्यातील खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या धरणाच्यापाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ टीएमसीने वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात मिळून आज सकाळपर्यंत ८ टीएमसी म्हणजे २७.४७ टक्के पाणीसाठा जमा झाला असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.

यंदा एप्रिल महिन्यापासून पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मान्सूनचे आगमन होईपर्यंत अवकाळी पाऊस पडत होता. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा धरणे भरण्यास लवकर सुरुवात झाली. गतवर्षी मात्र यादिवशी चारही धरणात मिळून ५.८१ टीएमसी पाणी उपलब्ध होते. आता २ टीएमसीने वाढ झाली असून ८.०१ पाणीसाठा जमा झाला आहे. तर टक्केवारी १९.९३ वरून २७.४७ वर आली आहे. 

आजपर्यंत खडकवासला ५९.६० टक्के, पानशेत ३५.५४ टक्के, वरसगाव १९.८५ टक्के, टेमघर १३.५३ टक्के पाणी जमा झाले आहे. चारही धरणात ८.०१ टीएमसी म्हणजे १.३९० टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पानशेत वरसगावमध्ये अनुक्रमे ३९ व ५१ क्यूसेकने पाणी जमा होत आहे.

मागील २४ तासात खडकवासला धरण येथे पाऊसच झालेला नाही. पानशेत येथे आठ, वरसगाव येथे सात तर टेमघर येथे १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता खडकवासला येथे ०, पानशेत १, वरसगाव २ व टेमघर २० मिलिमीटर पाऊस झाला होता. शनिवारपासून खडकवासला साखळीतील पावसाचा जोर फार कमी होत गेला आहे. परिणामी धरणाच्या पाणी साठ्यात हळूहळू वाढ होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसkhadakwasala-acखडकवासला