शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महानगरपालिकेने करार न केल्यास पाणीपट्टी होणार दुप्पट : जलसंपदा विभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 20:20 IST

गेल्या दहा महिन्यांपासून जलसंपदा-महानगरपालिकेतील पाणी करार रखडला आहे...

ठळक मुद्देनोव्हेंबर अखेरीस महानगरपालिकेला नवा करार करावा लागणार

पुणे : महानगरपालिकेने रखडलेली पाणीपट्टी करार न केल्यास पाण्याची दर आकारणी नियमानुसार दुप्पट करण्याचा असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनास दिला आहे. येत्या नोव्हेंबर अखेरीस करार करण्यास जलसंपदाने बजावले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून जलसंपदा-महानगरपालिकेतील पाणी करार रखडला आहे. महापालिकेच्या विनंतीनुसार जलसंपदा विभागाने एकदा मुदतवाढ दिली होती. आता, यापुढे मुदतवाढ देणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले असल्याचे समजते.शहरात पिण्याच्या पाण्यासह, औद्योगिक आणि सिंचनासाठी पाणी वापराचे नियोजन करता यावे, यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागामध्ये पाणी करार होणे आवश्यक आहे. या पूर्वी झालेला १ मार्च २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१९चा करार नुकताच संपुष्टात आला आहे. या कराराची मुदत संपल्यानंतर नव्वद दिवसांत कराराचे नुतनीकरण गरजेचे आहे. त्यानंतरही करार झाला नाही. जलसंपदा विभागाने ३१ आॅगस्टपर्यंत करार करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. याबाबत जलसंपदा विभागाने वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नसल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाºयांनी सांगितले.------------------थकबाकी भरल्यानंतरच होईल नवा पाणीकरारमहानगरपालिका प्रशासनाकडे २०१७ ते जून २०१९ या कालावधीत सुमारे १४६ कोटी ५० लाख रूपयांची थकबाकी होती. ही थकबाकी पुनर्गठीत करून १२८ कोटी २६ लाख रुपयापर्यंत कमी करण्यात आली. जलसंपत्ती प्राधिकरणानाच्या मापदंडानुसार महानगरपालिकेला ८.५० अब्ज घनफूट (टीएमसी) वार्षिक पाणी मंजूर आहे. मात्र, सरकारने हा पाणी कोटा वाढवून ११.५० टीएमसी केला आहे. त्यानुसार पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. थकीत असलेल्या १२८ कोटी २६ लाख रुपयांपैकी महानगरपालिकेने ८८ कोटी २८ लाख रुपये जलसंपदा विभागाला दिले आहेत. अजूनही ३९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जमा केल्याशिवाय नवीन पाणी करार होणार नसल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका