शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

मुळशी तालुक्याला टेमघरचे पाणी द्यावे : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:13 IST

बावधन, भुगाव, भुकुम, लवळे, सूस या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा कोणत्याही प्रकारचा स्रोत नाही.

ठळक मुद्देमतदारसंघातील रस्त्यांची कामे करण्याची केली मागणी

पुणे : मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून मुळशी तालुक्यातील ४७ वाड्यावस्त्यांना टेमघर धरणातून बावधन, भुकुम आणि भूगाव या गावांना पाणीपुरवठा करावा. मुळशी, दौंड तालुका आणि खडकवासला मतदारसंघातील रस्ते, ओढ्यांवरील साकव, संरक्षण भिंत अशी विविध कामे करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सोमवारी केली.सुळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला. पाणी, रस्ते, रिंगरोड व मेट्रो आदी विषयांचा आढावा घेतला. यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेश कोंढरे, वैशाली नागवडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बावधन, भुगाव, भुकुम, लवळे, सूस या शहरालगतच्या गावांमध्ये नागरीकरण झाले आहे. या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा कोणत्याही प्रकारचा स्रोत नाही. त्यामुळे या गावांना पीएमआरडीए मार्फत टेमघर धरणांमधून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सुळे यांनी या बैठकीत केली. या विषयावर येत्या महिनाअखेरीस पुन्हा बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन पीएमआरडीएकडून देण्यात आले.त्याचबरोबर पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात रस्त्याचे नियोजन करताना पाणंद रस्त्याचा समावेश विकास आराखड्यामध्ये करावा. आहिरे गावास एनडीए हद्दीलगत पर्यायी रस्ता देण्याची व्यवस्था करावी. खडकवासला मतदारसंघातील धायरी कात्रज रस्त्याची रुंदी ३० मीटक ठेवावी, किरकटवाडी-खडकवासला शीव रस्ता दुरुस्त करावा, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मालखेड, खानापूर, मनेरवाडी, खामगाव मावळ, डोणजे, सांगरून, बाहुली, कुडजे, कोंढवे धावडे, कोपरेगाव,गोऱ्हे , खडकवासला, कल्याण, रहाटावडे, गाऊडदरा, गोगलवाडी, आगळंबे, मांडवी, खडकवाडी, किरकटवाडी, नांदोशी, जांभळी, आर्वी या गावांचे पाणंद रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट करावेत. रिंगरोडसाठी जमीन संपादनापोटी दिल्या जाणाºया हस्तंतरणीय विकसन हक्क (टीडीआर) देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.  

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेWaterपाणी