शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जलसुरक्षकाचा प्रस्ताव हरवला सरकारी निर्णयाच्या दुष्काळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 01:41 IST

जलस्थितीचा अचूक अंदाजच समजेना

- विशाल शिर्के पुणे : दुष्काळी स्थितीचा अंदाज येण्यासाठी भूजलाची अचूक माहिती आणि पर्जन्याच्या नोंदी घेण्यासाठी राज्यात पुरेशी यंत्रणाच नसल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात ३३ हजार ठिकाणी यासाठी निरिक्षण विहिरी घेण्यासाठी जलसुरक्षक नेमण्याचा प्रस्ताव सरकारी निर्णयाच्या दुष्काळात हरविला आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून राज्य सरकारला या योजनेच्या मसूद्यास मान्यता द्यावी असे स्मरणपत्र पाठवूनही त्यावर गेल्या वर्षभरात कार्यवाही झालेली नाही. देशासह राज्यात पाच वर्षांतील एक वर्षे दुष्काळाचे, एक कमी पावसाचे आणि एक वर्षे बऱ्या पावसाचे जाते. त्यामुळे उपलब्ध पावसाचा योग्य वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे निरीक्षण केले जाते. हा आकडा ३३ हजारांवर वाढविण्यात येणार आहे. या नोंदी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्व्हरला थेट पाठविण्यात येतील. या नोंदी घेण्यासाठी ग्रामपंचायतीत असणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचाºयाची नियुक्ती करावी. त्यास जलसुरक्षक असे संबोधावे असा मसुदा भूजल विभागाने राज्य सरकारला दिला आहे. या मसूद्यावर कोणताही निर्णय न झाल्याने यंदाच्या मॉन्सूनमध्ये भूजल पातळीबरोबरच पर्जन्यमान देखील नोंदविता आले नाही. राज्यात सरासरीच्या ८४ टक्के इतका पाऊस झाला आहे. मराठवाडा, नागूर, अमरावती व नाशिक विभागातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. पाण्याच्या नियोजनासाठी, दुष्काळी भागात योजना राबविणसाठी या भूजल नोंदी म्हत्त्वाच्या ठरणार आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहायाने राबविण्यात येणाºया जलस्वराज्य कार्यक्रमांतर्गत पर्जन्यमान व भूजल नोंदीचा कार्यक्रम राज्यसरकारने हाती घेतला आहे.जलसुरक्षक नेमणे, त्याचे प्रशिक्षण आणि मानधनाबाबत सविस्तर मसूदा तयार करुन राज्य सरकारला दिला आहे. हा मसूदा मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे.- शेखर गायकवाड, संचालक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई