शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात भामा आसखेड धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:09 IST

शेतकऱ्यांचे आंदोलन पोलीसबळाचा वापर करून मोडीत काढण्यास  धरण प्रशासनाने सुरुवात केली आहे. आज भामा- आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये धरणामधून पाणी सोडले. 

ठळक मुद्देभामा-आसखेड धरण : आंदोलन आणखी चिघळणारभामा-आसखेडला छावणीचे स्वरूप 

खेड : पाईट( ता. खेड ) येथील धरणग्रस्त आंदोलकांनी तीन दिवसांपूर्वी बंद केलेले भामा-आसखेड धरणातील पाण्याचे आवर्तन सोमवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले. यात १00 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आंदोलक संतापले असून, मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन  पोलीसबळाचा वापर करून मोडीत काढण्यास  धरण प्रशासनाने सुरुवात केली आहे. आज भामा- आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये धरणामधून पाणी सोडले. ५ एप्रिल रोजी धरण प्रशासनाने सोडलेले आवर्तन शेतकऱ्यांनी ६ एप्रिलला बंद केले होते. यावर भामा-आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाने १११ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. आज भामा-आसखेड सिंचन विभाग उपविभाग करंजविहिरे, यांनी पाणी सोडण्याची सर्व तयारी करुन सकाळी ११ वाजता सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंते लोंढे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, शाखा अधिकारी भारत बेंद्रे, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, तहसीलदार सुनील जोशी, चाकण पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, मंडल अधिकारी हरिचंद्र सोनवणे आदींच्या उपस्थितीत पुन्हा पाणी सोडण्यात आले. सायंकाळी पाणी सोडण्याचा वेग वाढवून ८०० क्युसेक्सवर नेला होता. आवर्तन १५ दिवस सोडण्यात येणार आहे. यामध्ये खेड तालुक्यातील १० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून शिरूर व हवेली तालुक्यातील ४ आणि दौंड तालुक्यातील ४ बंधारे भरण्यात येणार आहेत. 

भामा-आसखेडला छावणीचे स्वरूप भामा-आसखेड धरणावर धरणग्रस्तांच्या आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ७० पोलिसांचा खडा पहारा ठेवला आहे. यामध्ये २ सीआरपीएफच्या तुकड्या, १ जिल्हा पोलीस दलाची राखीव तुकडी व १४ महिला कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धरणावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे . या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

 

टॅग्स :KhedखेडDamधरणPoliceपोलिसFarmerशेतकरी