Pune: घोरपडी पेठेत जलवाहिनी फुटली! हजारो लीटर पाणी वाया, ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत

By राजू हिंगे | Published: April 11, 2024 06:08 PM2024-04-11T18:08:59+5:302024-04-11T18:09:18+5:30

उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टॅकरवर अवलंबुन राहवे लागत असल्याने हजारो लीटर पाणी वाया गेल्याने नाराजी व्यक्त केली

Water pipe burst in Ghorpadi Peth Thousands of liters of water was wasted and water supply was disrupted in summer | Pune: घोरपडी पेठेत जलवाहिनी फुटली! हजारो लीटर पाणी वाया, ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत

Pune: घोरपडी पेठेत जलवाहिनी फुटली! हजारो लीटर पाणी वाया, ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत

पुणे : पुणे शहरातील घोरपडी पेठेत समान पाणी पुरवठा योजनेचे काम करत असताना जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 
   
शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. योजनेसाठी शहरात तब्बल १ हजार ८०० किलोमिटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात  येत आहेत.  शहराच्या काही भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.  घोरपडी पेठेतही समान पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन जलवाहिनी टाकण्याचे  काम सुरू आहे.  हे काम करताना पुणे महापालिकेची पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामध्ये हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. ऐन उन्हाळयात शहराच्या भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टॅकरवर अवलंबुन राहवे लागत आहे. त्यात हजारो लीटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

घोरपडी पेठेतील पाण्याची जलवाहिनी  काम करताना फुटली होती.  पालिकेने अवघ्या काही तासात ही जलवाहिनी दुरूस्त केली. - नंदकिशोर जगताप, विभाग प्रमुख , पाणी पुरवठा , पुणे महापालिका

Web Title: Water pipe burst in Ghorpadi Peth Thousands of liters of water was wasted and water supply was disrupted in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.