शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कलिंगड, खरबूजचे दर वाढले; पपई, संत्रीचे दर उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 15:42 IST

सर्वच फळांची आवक वाढली : लिंबाचे दर घसरले

ठळक मुद्देअन्य सर्व फळांचे दर स्थिर असल्याची माहिती

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळविभागात सर्वच फळांची आवक वाढली आहे. मागणी वाढल्याने कलिंगड, खरबुजाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. यात कलिंगडाचे दर किलोमागे २ रुपयांनी तर खरबुजाचे दर किलोमागे ५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर पपई आणि संत्र्यांची आवक वाढल्याने दरामध्ये घट झाली आहे. अन्य सर्व फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डमधील फळबाजारात रविवार (दि.५) रोजी केरळ येथून अननस ५ ट्रक, मोसंबी ५० टन, संत्री ८ ते १० टन, डाळिंब २०० ते २२५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे सहा ते सात हजार गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, सफरचंद ३ ते ४ हजार बॉक्स, सिताफळ ३ ते साडे तीन टन, तीन हजार पोती, खरबुजाची ५ ते ६ टेम्पो इतकी आवक झाल्याचे व्यापाºयांनीसांगितले. बाजारात लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक दिवसांपासून लिंबाचे दर घसरले आहेत. तर चांगल्या दर्जाच्या लिंबाच्या दरात गोणीमागे १० ते २० रूपयांनी वाढ झाली आहे.फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ८०-१२०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १००-२५०, (४ डझन) : ४०-९०, संत्रा : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन) : ८०-१३०, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : २०-७०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१५, खरबुज : १०-२०, पपई : ३-१५, सिताफळ : २०-१२५, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) १०००-१४००, अमेरिकन डेलिशिअस ११००-१३००, महाराजा ७००-९००. बोरे (१० किलो) : चेकनट : ३८०-४००, उमराण : २०-४०, चमेली : ६०-१००, चण्यामण्या : ३००-३५०. स्ट्रॉबेरी (२ किलो) ७०-१७० इतका भाव मिळाला.--फुलांच्या उत्पादनावर थंडीचा परिणामथंडीमुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम होत असून, लिली, गुलछडीच्या फुलांना सर्वांधिक फटका बसला आहे. यामुळे फुलांचा दर्जा खालवला असून, मागणी देखील कामी आहे. सणासुदीचे दिवस कमी असल्याने फुलांना अपेक्षित मागणी देखील नाही. यामुळे मार्केट यार्डात फुलांचे दर २० टक्क्यांनी घटले आहेत.

टॅग्स :PuneपुणेfruitsफळेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन