पवनानगर - मावळ सह पिंपरी चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आसलेले पवना धरण ७२% भरले असून पाण्याची चिंता संपली आहे . या वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा विचार करून पुर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून धरणातून सांडव्यातून ४०० क्युसेक्सने पाणी पवनानदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे.गेल्या २४ तासात ३३ मि.मि.इतका पाऊस पडला आहे तर १ जूनपासून १०८५ मिलीमिटर इतका पाऊस पडला आहे.
पवना धरण ७२ टक्के भरले असून पाण्याची चिंता संपली आहे.धरणातून सांडव्याद्वारे ४०० क्युसेक्सने पाणी विसर्ग सुरू राहिल मात्र पाणी हे जीवन असून पाणी जपून वापरावे तर पुढील काळात पाऊस वाढल्यास धरणात येणाऱ्या येव्या नुसार पाणी विसर्ग केला जाईल नदिकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. - सचिन गाडे,अभियंता पवना पाटबंधारे विभाग