शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा आॅनलाईनच पाहावा ; पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 19:44 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना घाटांवर जाण्यास बंदी,घरीच विसर्जन करावे...

ठळक मुद्देआवश्यकतेनुसार रस्ते बंद करण्यात येणार

भाविकांना घाटांवर जाण्यास बंदी  आवश्यकतेनुसार रस्ते बंद करणारपुणे : गेले १० दिवस गणेशोत्सव ज्या साधेपणाने साजरा केला. त्याचप्रमाणे गणेश विसर्जन जागेवरच करावे. मानाच्या गणपतीचे विसर्जनही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित करायचे आहे. विसर्जन सोहळा भाविकांनी आॅनलाईनच पाहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आवश्यकता भासल्यास मानाचा गणपतीचे विसर्जनाच्या वेळेला तेथील रस्ते बंद करण्यात येणार असून तेथील वाहतूक अन्य रस्त्यावर वळविण्यात येणार आहे.शहरात जवळपास ४ लाख ७३ लाख घरगुती गणपती बसविले जातात. दीड दिवस, पाचवा, सहावा आणि सातव्या दिवशी गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी कोणीही घाटावर आले नाही. सर्वांनी घरात अथवा घराजवळ उपलब्ध करण्यात आलेल्या हौदात विसर्जन केले आहे. याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, या गणेशोत्सवातपोलिसांनी तयार केलेल्या आचारसंहितेचे १०० टक्के पालन करुन पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काही जण घाटावर आले होते. त्यांना परत पाठविण्यात आले होते. हा अपवाद वगळता त्यानंतर कोणीही नदीकाठी विसर्जनासाठी आले नाही.७५ टक्के सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मंदिरातच उत्सव साजरा केला. काही मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत होते. त्यांना पोलिसांनी माघारी पाठविले. मानाच्या गणपतींनी त्यांचे गणेश मूर्तीचे विसर्जनाच्या वेळा जाहीर केल्या असून त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे़ त्यामुळे भाविकांनी घरी बसूनच हा सोहळा पहावा. ७ हजार पोलिसांचा बंदोबस्तदरवर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांना रात्रभर बंदोबस्त करावा लागतो. यंदा तो करावा लागणार नसला तरी पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त राहणार आहे.मानाच्या गणपतीच्या ठिकाणी नागरिकांनी येऊ नये, तसेच शहरात नागरिकांनी गर्दी करु नये, यासाठी सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकासह ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी मंगळवारी रस्त्यावर असणार आहेत.मानाच्या गणपतीच्या विसर्जनप्रसंगी तेथे नागरिकांनी गर्दी करु नये, यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास शिवाजी रोडवरील वाहतूक बंद करुन ती अन्य रस्त्याने वळविण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस