शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘नो एंट्री’ मध्ये घुसणाऱ्यांवर राहणार नजर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 13:02 IST

शहरातील कोणत्याही रस्त्यावर गेल्यास  ‘एंट्री’ आणि ‘विरुद्ध’ बाजुने येणारे वाहनचालक हमखास दृष्टीस पडतातच.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांकडून ५३ ठिकाणांची यादी तयारही समस्या दिवसेंदिवस वाढतच असून गंभीर तसेच किरकोळ अपघाताला निमंत्रण देणारी

पुणे : शहरातील कोणत्याही रस्त्यावर गेल्यास  ‘एंट्री’ आणि ‘विरुद्ध’ बाजुने येणारे वाहनचालक हमखास दृष्टीस पडतातच. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच असून गंभीर तसेच किरकोळ अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील अशा ५३ ठिकाणांची जंत्रीच तयार केली असून या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या २२ विभागांमधून ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत.    खडक वाहतूक विभागाच्या हद्दीतील शिवाजी रस्ता ते राष्ट्रभूषण चौक, मामलेदार कचेरी चौक ते फडगेट चौक या ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे. तर फरासखाना विभागांतर्गत पासोड्या विठोबा, विजय मारुती चौक, विश्रामबाग विभागांतर्गत मंदार लॉज ते अहिल्यादेवी शाळा, नागनाथ पार ते खजिना विहीर, समर्थ विभागांतर्गत रामोशी गेट ते भवानी माता मंदिर, अपोलो सिनेमा ते सोमवार पेठ पोलीस चौकी, डेक्कन विभागांतर्गत डेक्कन पीएमपी बसथांबा, कामत जंक्शन, फर्ग्यूसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार, हॉटेल रुपाली, कोथरुडला मोरे विद्यालय, एसबीआय चौक यांचा समावेश आहे.   यासोबतच वारजे विभागातील सुवर्ण हॉटेल ते वारजे जंक्शन रस्ता, वनदेवी चौक ते वनाझ बस थांबा, धुमाळ चौक ते भाजी मंडई, ढोणे वाडा ते वारजे जंक्शन, वारजे चौक ते वारजे महामार्ग, चांदणी चौक ते वेध भक्त ही ठिकाणे अधिक संवेदनशील आहेत. दत्तवाडी विभागातील गणेश मळा, गोयल गंगा, धायरी फाटा, नवले ब्रीज ते सेवा रस्ता यांचाही समावेश आहे. सहकार नगरमधील महेश सोसायटी, चंद्रलोक, पुष्पमंगल, भारती विद्यापीठ विभागातील लोखंडी पुल ते धनकवडी फाटा, अभिनव महाविद्यालयासमोरील रस्ता, स्वारगेट येथील गगन गॅलेक्सी, लष्कर परिसरातील कोहिनूर हॉटेल ते मोहम्मद रफी चौकी, पुलगेट ते डॉ. आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन ते अलंकार या ठिकाणांवरही वाहनचालक विरुद्ध बाजुने येतात.   कोरेगाव पार्क भागातील रेल्वे पुल ते नायडू रुग्णालय, सेंट मीरा ते दरोडे पथ, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे ते ब्ल्यू डायमंड हॉटेल, चतु:श्रृंगी विभागातील चतु:श्रृंगी मंदिर रस्ता ते महाबळेश्वर चौक, खडकी येथील बोपोडी चौक, येरवडा येथील गुंजन चौक ते पर्णकुटी, प्रतिक नगर ते सारस्वत बँक चौक, बिशप चौक ते रामवाडी चौक ही ठिकाणे आहेत.   विमानतळ परिसरातील संजय पार्क ते दोराबजी चौक, सोमनाथ नगर चौक ते टाटा गार्ड रुम चौक, कोंढव्यातील लुल्लानगर चौकाशेजारील माऊंट कार्मेल शाळा, वानवडी येथील रामटेकडी, फातिमानगर, सोपानबाग, हडपसर परिसरातील मुंढवा नदी पूल, सिरम पंक्चर ते मांजरी फाटा, वेदवाडी चौक या ठिकाणांचाही समावेश आहे.   ====  वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या या अहवालात केवळ शिवाजीनगर विभागातील एकही ठिकाण दर्शविण्यात आलेले नाही. वास्तविक शिवाजीनगरच्या अनेक भागांमध्ये विरुद्ध बाजुने येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. याठिकाणीही उपाययोजनांची आवश्यकता आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस