शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७ मेपर्यंत वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा; या जिल्ह्यात गारपिटीचीहीशक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 20:03 IST

राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 

पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात आता उत्तर अंतर्गत कर्नाटक व लगतच्या भागाकडे सरकला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

सातत्याने होत असलेल्या पावसामुळे ऐन उन्हाळ्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील कमाल व किमान तापमानात घट झाली असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४१.२ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

गेल्या २४ तासात राज्यात बुलढाणा ३०, चंद्रपूर १२, महाबळेश्वर २०, पुणे २७, पाषाण २२.५, पणजी ११, मार्मागोवा व परभणी ६, जालना ३, औरंगाबाद १.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर, औरंगाबाद, नागपूर, गोंदिया, पुणे येथे हलका पाऊस झाला.

राज्यात होत असलेल्या पावसामुळे विदर्भाच्या बर्‍याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे. 

राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.  ५ मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून ६ व ७ मे रोजी संपूर्ण राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाटयाचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरीagricultureशेती