शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७ मेपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:17 IST

हवामान विभाग : ऐन उन्हाळ्यात तापमान घटले लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय ...

हवामान विभाग : ऐन उन्हाळ्यात तापमान घटले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात आता उत्तर अंतर्गत कर्नाटक व लगतच्या भागाकडे सरकला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सातत्याने होत असलेल्या पावसामुळे ऐन उन्हाळ्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील कमाल व किमान तापमानात घट झाली असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४१.२ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात बुलडाणा ३०, चंद्रपूर १२, महाबळेश्वर २०, पुणे २७, पाषाण २२.५, पणजी ११, मार्मागोवा व परभणी ६, जालना ३, औरंगाबाद १.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर, औरंगाबाद, नागपूर, गोंदिया, पुणे येथे हलका पाऊस झाला.

राज्यात होत असलेल्या पावसामुळे विदर्भाच्या बऱ्याच भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

वेगवान वाऱ्याची शक्यता

५ मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, ६ व ७ मे रोजी संपूर्ण राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.