पुणे : बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा तसेच त्याजवळील छत्तीसगडमध्ये तयार झालेल्या चक्रावातामुळे तसेच अरबी समुद्रातील द्रोणीय स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे राज्यात सक्रिय असून, सर्वदूर चांगला पाऊस होत आहे. परिणामी येत्या दोन दिवसांत कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, तर मध्यम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मंगळवारी मध्यरात्रीपासून बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यातही कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात अतिवृष्टी झाली. पावसाचा हा जोर कायम राहणार असला तरी बुधवारी सायंकाळपर्यंत पाऊस कमी प्रमाणत पडला. बुधवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत पडलेला पाऊस (मिमीमध्ये) : पुणे- ९, महाबळेश्वर- ५, मुंबई- २, सांताक्रुझ- ३, रत्नागिरी- १, डहाणू- २, औरंगाबाद- १.
हवामान विभागाने येत्या दोन दिवसांसाठी दिलेला पावसाचा अंदाज
ठाणे, मुंबई : मुसळधारधुळे, नंदुरबार, जळगाव : मध्यम ते जोरदार पाऊसनाशिक काही ठिकाणी : मुसळधारनगर, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद : मध्यमऔरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड : मध्यम ते जोरदारविदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.