वऱ्हाडी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचं मंगळसूत्र हिसकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 22:02 IST2017-12-10T22:02:08+5:302017-12-10T22:02:58+5:30
वाकड : लग्न समारंभासाठी वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली.

वऱ्हाडी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचं मंगळसूत्र हिसकावले
वाकड : लग्न समारंभासाठी वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी शोभा आनंदा शिंदे (वय ३२, रा. आचलगाव, सातारा) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम यांनी दिलेली माहिती अशी शोभा शिंदे यांच्या नातेवाईकांचे येथील काळाखडक झोपडपट्टीजवळील कार्यालयात लग्न होते, ते या लग्न समारंभासाठी वाकडला आल्या होत्या. मंगल कार्यालयाजवळच मुंजोबा नगर गल्ली नं २ मध्ये नवरदेवाचे घर असल्याने शिंदे ह्या फ्रेश होण्यासाठी दुपारी लगीन घरी पायी जात होत्या. तेवढ्यात काळ्या रंगाची दुचाकी आली दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेट घातले होते, तर मागे बसलेल्याने तोंडाला स्कार्फ बांधला होता.
शिंदे ह्या एकट्याच चालल्या असून त्यांच्या गळ्यात दागिने असल्याचे नेहाळत पुढे गेलेली दुचाकी पुन्हा परत आली यातील मागे बसल्याने मंगळसूत्र हिसकाविले काही कळण्याच्या आत दुचाकी वाऱ्याच्या वेगात निघून गेली.शिंदे यांनी आरडा ओरडा करताच जमा झालेल्या गर्दीने नियंत्रण कक्षाला माहिती कळविली.