शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

प्रभाग रचना पारदर्शक व्हावी यात कोणाचेही हित, अहित नसावे - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 09:44 IST

आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी समाविष्ट गावांमधील मिळकत कर रद्द करण्यात आला.

पुणे : प्रभाग रचनेसंदर्भात प्रसार माध्यमांमधून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे प्रभाग रचना पारदर्शक पद्धतीने व्हावी, यात कोणाचेही हित, अहित नसावे. यासाठी शासनाने महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी एक आदर्श नमुना तयार करावे व ते संपूर्ण राज्यासाठी लागू करावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेअंतर्गत येणारा भाग आणि महापालिकेच्या समाविष्ट गावांतील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खा. सुळे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी आमदार बापू पठारे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे, सचिन दोडके, नीलेश निकम, स्वाती पोकळे, स्मिता कोंढरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी समाविष्ट गावांमधील मिळकत कर रद्द करण्यात आला. आता पुन्हा तो भरण्यास सांगितले जात आहे. निवडणूक आल्यावर रद्द आणि निवडणूक जिंकल्यानंतर वसुली अशा प्रकारे मनमानी पद्धतेने देश व राज्य चालवता येत नाही. देशाचा व राज्याचा कारभार संविधानाप्रमाणे चालणे गरजेचे आहे. अहमदाबाद येथील विमान अपघातावर त्या म्हणाल्या, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. आता त्याच्या रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी करू. रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांचे काम चांगले आहे. त्यांनी रस्ते केले आहेत. मात्र, अपघातही वाढले आहेत. पुण्यात विमानतळाचे नवं टर्मिनल झाले आणि पहिल्या पावसात ते तुंबले, याची चौकशी व्हावी. सार्वजनिक वाहतूक हा विषय योग्य पद्धतीने हाताळायला हवा. मी हा विषय संसदेत मांडणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, गंगाधाम चौकातील रस्त्याची कामे लवकर पूर्ण करावीत. जुन्या वाड्यांची अवस्था बिकट आहे. अनेक प्रकल्प रखडले आहेत. खडकवासला धरणातील प्रदूषणावर लक्ष घालावे. यासह मान्सून पूर्व कामे, पालखी आगमनाची तयारी, समाविष्ट गावांतील मूलभूत समस्या आदींवर चर्चा झाल्याचे सुळे यांनी सांगितले.

दहा वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी :

साधा माणूसही स्वस्तात विमान प्रवासात जात असल्याची जाहिराती केल्या जातात. मात्र, सरकारचे सुरक्षिततेला प्राधान्य नाही. नागरी उड्डाण क्षेत्रात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित प्रश्न आहेत. या संदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पारदर्शकता ठेवून गेल्या दहा वर्षांतील कामकाजाची एक श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळे