देहू नगरपंचायतीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा व आरक्षणाची सोडत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:54 PM2021-11-12T18:54:22+5:302021-11-12T18:56:36+5:30

प्रभागाचा प्रारुप आराखडा जाहिर झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले असून बहूतांश इच्छुकांची अनपेक्षित प्रभाग रचनेमुळे धावपळ होणार आहे

ward draft plan and reservation for dehu nagar panchayat announced | देहू नगरपंचायतीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा व आरक्षणाची सोडत जाहीर

देहू नगरपंचायतीसाठी प्रभाग प्रारूप आराखडा व आरक्षणाची सोडत जाहीर

googlenewsNext

देहूगावःदेहूनगर पंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग प्ररूप आराखडा व आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आले आहे. प्रभागाचा प्रारुप आराखडा जाहिर झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले असून बहूतांश इच्छुकांची अनपेक्षित प्रभाग रचनेमुळे धावपळ होणार आहे. येथे 8 डिसेंबर रोजी स्थापन झालेल्या देहू नगरपंचायतीची 17 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून एक वार्ड एक सदस्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी 2011 सालच्या जनगणनेनुसार 18 हजार 269 लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. यासाठीची नवी प्रभाग रचना व आरक्षणे जाहिर करण्यात आली आहेत.

प्रभाग रचना खालील प्रमाणे- प्रभाग क्रमांक व हद्द 1)  उत्तरेस- इंद्रायणी नदी, पूर्वस- सरकारी गायरान व ब्रम्ह विद्यालय आश्रम, दक्षिणेस- भिमाशंकर सोसायटी रस्ता व भिमाशंकर मंदिर, पश्चिमेस- गाथा मंदिर,  प्रभाग क्रमांक 2)  उत्तरेस- गायरान व वनीकरण, तळवडे शीव रस्ता, पूर्वस- इंद्रायणी नदी, दक्षिणेस- बैलगाडा रस्ता, देहू आळंदी रस्ता व खंडेराया मंडळ, पश्चिमेस- साखळी रस्ता व भीमाशंकर सोयायटी रस्ता, प्रभाग क्रमांक 3) उत्तरेस- बैलगाडा रस्ता, पूर्वस- शीव रस्ता तळवडे, दक्षिणेस- सरकारी घरकुल, पश्चिमेस- खंडोबा मंदीर, प्रभाग क्रमांक 4) उत्तरेस- सरकारी गायरान, घरकुल रस्ता, पूर्वस- तळवडे शीव रस्ता, दक्षिणेस- देहू आळंदी रस्ता (पेट्रोल पंप), पश्चिमेस- विठ्ठल मंदिर, देहू आळंदी रस्ता, प्रभाग क्रमांक 5) उत्तरेस- देहू आळंदी रस्ता, विठ्ठलवाडी राजा गणपती मंडळ, पूर्वस- तळवडे हॉस्पिटल शीव रस्ता, दक्षिणेस- कॅन्टोमेंट हद्द, पश्चिमेस- काळोखे वाडा रस्ता,

प्रभाग क्रमांक 6) उत्तरेस-देहू आळंदी रस्ता, पूर्वस- काळोखे वाडा रस्ता, मुंगसे आळी, दक्षिणेस- कॅन्टोमेंट हद्द, पश्चिमेस- काळोखे वाडा रस्ता, विठ्ठलनगर, माळीनगर हद्द, जुना पालखी मार्ग, प्रभाग क्रमांक 7) उत्तरेस- डिगंबर माळी निवास रस्ता, पूर्वस- निसर्ग सोसायटी रस्ता, नवचैतन्य सोसायटी, दक्षिणेस- देहू आळंदी रस्ता, पश्चिमेस- ओंकार सोसायटी दक्षिणे भाग, ओम साई सोसायटी, प्रभाग क्रमांक 8) उत्तरेस- काळोखे शेती व एस,टी स्टॅड परिसर, पूर्वस- ओंकार सोसायटी, दक्षिणेस- देहू आळंदी रस्ता, पश्चिमेस- देहू ते देहूरोड रस्ता, एस. टी. स्टॅन्ड ते प्रवेशद्वार कमान, प्रभाग क्रमांक 9) उत्तरेस 1.1 बाह्यवळण रस्ता, ओढ्या पर्य़ंत, पूर्वस- साई दर्शन सोसायटी व इंद्रायणी सोसायटी, दक्षिणेस- देहूरो़ड रस्ता, कार्पोरेशन बॅंक, पश्चिमेस- गाथा मंदिर रस्ता, चावडी,  प्रभाग क्रमांक 10) उत्तरेस- येलवा़डी रस्ता, 1.1 बाह्य वळण रस्ता, भैरवनाथ चौक, पूर्वेस फोर एस इंग्लिश मेडीयम स्कुल, दक्षिणेस- जुना ओढा, खाण, सार्वजनिक हातपंप, पोलीस चौकी, पश्चिमेस- इंद्रायणी नदी,

प्रभाग क्रमांक 11) उत्तरेस- प्राथमिक आरोग्य केंद्र, देहूरोड रस्ता, पूर्वस- देहू देहूरोड रस्ता, संभाजी चौक, दक्षिणेस- महाद्वार रस्ता काही भाग, मोरे यांचे निवास, पश्चिमेस- जंगली महाराज रस्ता, महाद्वार चौक, प्रभाग क्रमांक 12) उत्तरेस-14 टाळकरी कमान, सुंदर गल्ली रस्ता, शिंदे ट्रेडर्स, पूर्वस- शिवाजी चौक, जंगली महाराज रस्ता, दक्षिणेस- इनामदार वाडा, मशीद, सुतारआळी, पश्चिमेस- इंद्रायणी नदी घाट, प्रभाग क्रमांक 13) उत्तरेस- सुतार आळी रस्ता व गावडे हॉस्पिटल, पूर्वस- देहू देहूरोड रस्ता, मुख्य कमान व बॅंक ऑफ महाराष्ट्र, दक्षिणेस- पाण्याच्या टाकीचा रस्ता, महालक्ष्मी मंदिर, पश्चिमेस- शिवाजी चौक ते संभाजी चौक, प्रभाग क्रमांक 14) उत्तरेस- खंडोजी बाबा धर्मशाळा व महावितरण कार्यालय, पूर्वस- पद्मश्री रुग्णालय, सह्याद्री सोसायटी रस्ता, जुना पालखी मार्ग, पोस्ट ऑफीस, दक्षिणेस- कापूर ओढा, परंडवाल चौक, पश्चिमेस- इंद्रायणी नदी माळीनगर हद्द,

प्रभाग क्रमांक 15) उत्तरेस- इंद्रायणी नदी, पूर्वेस- बोडकेवाडी रस्ता, परंडवाल चौक, महात्मा फुले चौक, दक्षिणेस- कॅन्टोमेंट हद्द, जगताप मळा, पश्चिमेस- इंद्रायणी नदी, प्रभाग क्रमांक 16) उत्तरेस- देहू देहूरोड रस्ता, अनगडशहावली दर्गा, महात्मा फुले चौक, पूर्वस- विठ्ठलनगर- माळीनगर हद्द, गुलमोहर पार्क सोसायटी, दक्षिणेस- देहूरोड कॅन्टोमेंट हद्द, पश्चिमेस- जिल्हा परिषद शाळा, माळीनगर व देहू देहूरोड रस्ता, प्रभाग क्रमांक 17) उत्तरेस- बोडकेवाडी रस्ता, कृष्ण मंदिर, पूर्वस- गर्ग प्रोव्हीजन स्टोअर्स, देहू देहूरोड रस्ता, दक्षिणेस- कॅन्टोंमेंट हद्द, पश्चिमेस- बोडकेवाडी रस्ता या प्रमाणे प्रभाग रचना जाहीर ककरण्यात आली आहे.

प्रभाग निहाय आरक्षणे पुढील प्रमाणे- प्रभाग क्रमांक 1) अनुसुचीत जमाती सर्वसाधारण- प्रभाग क्रमांक 2) सर्वसाधारण- महिला, प्रभाग क्रमांक 3) अनुसुचीत जाती- महिला, प्रभाग क्रमांक 4) अनुसुचीत जाती- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6) सर्वसाधारण- महिला, प्रभाग क्रमांक 7) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8) सर्वसाधारण - महिला, प्रभाग क्रमांक 9) अनुसुचीत जाती महिला, प्रभाग क्रमांक 10) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11) नागरिकांचा मागास प्रवर्ग- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12) नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला, प्रभाग क्रमांक 13) सर्वसाधारण - महिला, प्रभाग क्रमांक 14) नागरिकांचा मागास प्रवर्ग- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 15) नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला, प्रभाग क्रमांक 16) सर्वसाधारण,  प्रभाग क्रमांक 17) सर्वसाधारण- महिला या प्रमाणे आरक्षणे निघाली आहेत.

ही सर्व आरक्षणे उपस्थितांच्या समोर लहान मुलांच्या हस्ते चिठ्टी काढून करण्यात आले. ही आरक्षणे हवेलीचे प्रांत संजय असवले,मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या उपस्तितीत कामकाज करण्यात आले. याबाबतच्या हरकती 16 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे. हरकती स्विकारण्यासाठी शनिवारी व रविवारी कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहणार आहे. या हरकतींवर सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात 17 नोव्हेबर रोजी करण्यात येणार आहे. याची माहिती संबधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी सांगितली.

Web Title: ward draft plan and reservation for dehu nagar panchayat announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.