शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

जिल्ह्यातील शाळांसाठी फिरते ग्रंथालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:50 PM

फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोचवण्याची चळवळ हाती घेण्यात आली आहे. दर महिन्याला पुणे जिल्ह्यातील ५० शाळांना भेट देण्याचा मानस करण्यात आला आहे

ठळक मुद्देअक्षरभारतीचे कार्यकर्ते दर महिन्याला ग्रंथालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद पुस्तक बदलण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी बारकोड यंत्रणा १०,००० हून अधिक विद्यार्थी आणि ५०० शिक्षकांना या ग्रंथालयाचा लाभ अक्षरभारतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ११०० हून अधिक ग्रंथालयांना हातभार

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : इंटरनेटचा भडिमार, मनोरंजनाचे वाढलेले पर्याय या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील वाचनाची अभिरुची कमी होत चालली आहे, असे सातत्याने म्हटले जाते. मात्र, केवळ ओरडा करण्यापेक्षा ‘अक्षरभारती’तर्फे वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जात आहे. फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोचवण्याची चळवळ हाती घेण्यात आली आहे. दर महिन्याला पुणे जिल्ह्यातील ५० शाळांना भेट देण्याचा मानस करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना संगणकसाक्षर करण्याच्या दृष्टीने ज्युनिअर आर्यभट्ट हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.आजकालची मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नित्यनेमाने केली जाते. मात्र, अभिरुची विकसित होण्यासाठी त्यांच्यापर्यंत वाचनीय पुस्तके पोचतात का, या मुलभूत प्रश्नाची उकलच केली जात नाही. शासनाकडून बहुतांश शाळांच्या ग्रंथालयांना नवीन पुस्तकेच उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर अक्षरभारती या संस्थेने पुढाकार घेऊन मुलांपर्यंत चांगली पुस्तके पोचवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ‘लायब्ररी आॅन व्हील्स’ हा अभिनव उपक्रम राबवली जात आहे.सुरुवातीला अक्षरभारतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ११०० हून अधिक ग्रंथालयांना हातभार लावला. प्रत्येक शाळेतील ग्रंथालयांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील २००-८०० पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. यामध्ये पुणे, मुळशी, मावळ येथील ५० हून अधिक शाळांना समाविष्ट करुन घेण्यात आले. या पुस्तकांची देखभाल करण्याची जबाबदारी स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडे सोपवण्यात आली आहे. अक्षरभारतीचे कार्यकर्ते दर महिन्याला ग्रंथालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. या ग्रंथालयांमध्ये मुलांसाठी वाचन, गोष्ट सांगणे, निबंध स्पर्धा, पुस्तक परीक्षण असे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांची आवड जाणून घेऊन पुढील पुस्तकांची निवड केली जाते, अशी माहिती ‘अक्षरभारती’चे केदार तापीकर यांनी दिली.फिरत्या ग्रंथालयात काही हजार पुस्तके उपलब्ध आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम अव्याहतपणे सुरु आहे. फिरते ग्रंथालय शाळांना महिन्यातून एकदा भेट देते. यावेळी मुलांना आधीची पुस्तके बदलण्याची, नवीन पुस्तके घेण्याची संधी मिळते. पुस्तक बदलण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी बारकोड यंत्रणा वापरली जात आहे. यामुळे १०,००० हून अधिक विद्यार्थी आणि ५०० शिक्षकांना या ग्रंथालयाचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.--------कोणती पुस्तके ?- आत्मचरित्र- माहितीपर- अनुवाद- कथा- शैक्षणिक- मनोरंजनात्मक------------नवीन काय?विद्यार्थ्यांना संगणकसाक्षर करता यावे, यासाठी अक्षरभारतीतर्फे ‘ज्युनिअर आर्यभट्ट’ हा प्रकल्प जानेवारीपासून सुरु करण्यात आला आहे. एल अँड टी इन्फोटेकच्या वतीने या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन संगणक ज्ञान दिले जाते. मुंबई आयआयटीचे प्रा. कन्नन एम मौदगल्य यांच्या सहकार्याने २०२० पर्यंत १,००,००० मुलांना संगणकसाक्षर करण्याचे ध्येय बाळगण्यात आले आहे.- ----------------शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली तरच भावी पिढीतील वाचक निर्माण होऊ शकतात. मुलांपर्यंत चांंगली पुस्तके पोचल्यास त्यांच्यामध्ये नक्कीच वाचनसंस्कृती जोपासली जाऊ शकते. त्यामुळे फिरत्या ग्रंथालयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला विदयार्थी आणि शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- केदार तापीकर, अक्षरभारती

टॅग्स :Puneपुणेlibraryवाचनालय