पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. त्यात वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यावरून आता तृप्ती देसाई यांनी सवाल उपस्थित केला आहे. रणजित कासले यांचं जर म्हणणं खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली? कधी दिली आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना का सांगितलं नाही? याचीही चौकशी करणं गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
देसाई म्हणाल्या. वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असं एका निलंबित अधिकाऱ्याने सांगितलंय. ते अधिकारी किती खरं बोलतात की खोटं हे माहित नाही. परंतु वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा खून होऊ शकतो. याची भीती मी आधी व्यक्त केलेली होती. आणि आत्तासुद्धा मोठमोठे जे मोगरे आहेत. त्यांचे वाल्मिक कराड नाव घेऊ शकतो. अनेकांचं राजकीय करिअर त्यामुळे उद्धवस्त होऊ शकतं. म्हणून त्याच्या जवळीलच टीम कराडचा एन्काउंटर करण्याची सुपारी देऊ शकते. तो जोपर्यंत बीड जिल्हा कारागृहात आहे तिथं त्याला जशी व्हीआयपी वागणूक मिळते आहे.
त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार आहे. स्लीप एपनिया या नावाच्या आजाराखाली श्वास घ्यायचं माणूस विसरतो. त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृतावस्थेत आढळला अशा पद्धतीची पोलीस घोषणा करू शकतात. त्यामुळं त्याला कधीही मारलं जाऊ शकतं. संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराडचा जर गेम झाला किंवा मारून टाकलं तर ही केस पूर्णपणे संपू शकते. त्यामुळं वाल्मिक कराडचा एन्काउंटर कधीही होऊ शकतो. तसंच रणजित कासले यांचं जर म्हणणं खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली? कधी दिली आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना का सांगितलं नाही? याचीही चौकशी करणं गरजेचं आहे.