वाल्हे : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुरंदर तालुक्यातील वाल्हे व पिंगोरी येथे सुरू असलेल्या कामाची जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली.या वेळी पुरंदर प्रांत अधिकारी समीर शेंगटे, पुरंदर तहसीलदार संजय पाटील, जिल्हा कृषी अधिकारी गोविंद कारकर, बारामती उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष कारकर, बारामती उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद परजणे, कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, गटविकास अधिकारी डॉ. काळे, राजेंद्र नलवडे, डी. डी. पाटील, एस. टी. सरडे, खेडेकर पी. डी., कृषिमित्र रवींद्र भोसले पिंगोरीच्या सरपंच पल्लवी भोसले, उपसरपंच धनंजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार, बाबा शिंदे, ग्रामसेवक संजय भोसले, राजन पवार, नीलेश शिंदे, सचिन देशपांडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)- पिंगोरी परिसरामध्ये सुरू असलेल्या सीसीटी व शेततळी व कृषी खात्यांतर्गत सलग समतल चर व नर्सरीची पाहणी केली. या वेळी वृक्षारोपण करण्यात आले. वाल्ह्यातील काळूबाई मंदिराच्या पायथ्याशी अंनगड दगडी बंधारे, माती माला बांध याचीही पाहणी करून जलयुक्त शिवारांतर्गत सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.
वाल्हे आणि पिंगोरीचा पाणीप्रश्न सुटणार
By admin | Updated: June 6, 2015 22:05 IST
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुरंदर तालुक्यातील वाल्हे व पिंगोरी येथे सुरू असलेल्या कामाची जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली.
वाल्हे आणि पिंगोरीचा पाणीप्रश्न सुटणार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}