महापालिकेच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा शैक्षणिक साहित्याची

By Admin | Updated: July 17, 2014 03:21 IST2014-07-17T03:21:48+5:302014-07-17T03:21:48+5:30

महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी शैक्षणिक साहित्य वाटप होऊ शकले नाही

Waiting for students of municipal students | महापालिकेच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा शैक्षणिक साहित्याची

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा शैक्षणिक साहित्याची

पिंपरी : महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी शैक्षणिक साहित्य वाटप होऊ शकले नाही. लोकसभा निवडणूक पाठोपाठ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे शैक्षणिक साहित्य वाटपास विलंब झाला असल्याचे शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे.
आचारसंहितेमुळे शैक्षणिक साहित्य वाटपाच्या फाइलवर आयुक्तांच्या सह्या नव्हत्या. आचारसंहिता संपुष्टात येताच आयुक्तांनी त्या फायलींवर सह्या केल्या असून, कामाचे आदेश दिले आहेत. लवकरच शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे, असे शिक्षण मंडळ सभापती फजल शेख यांनी
सांगितले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी दप्तर, गणवेश, बूट, मोजे, वह्या पुस्तके तसेच
रेनकोट वाटप केले जाते. शाळा सुरू होताच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. यंदा मात्र शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यापैकी काहीच मिळालेले नाही. शैक्षणिक साहित्य
खरेदीची प्रक्रिया दोन वर्षांपूर्वीच झालेली आहे, आचारसंहिता हेच शैक्षणिक साहित्य वाटपास विलंब होण्याचे कारण आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for students of municipal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.