शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: थांब जरा तू मला उद्या भेटशील का? असं म्हणत सुपरवायझरने धरला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 20:20 IST

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धायरी : थांब जरा मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू मला उद्या भेटशील का असं म्हणत महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची प्रकार नऱ्हे येथे घडला आहे. याबाबत २२ वर्षीय विवाहित महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी मंगेश विष्णू दीक्षित (वय:३६ वर्षे, रा. स्वामी नगर आंबेगाव पठार, पुणे ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सिंहगड रस्ता पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार महिला ह्या नऱ्हे येथील एका खासगी कंपनीत कामास आहेत. त्याच कंपनीत काम करीत असणारा सुपरवायझर मंगेश दीक्षित हा डिसेंबर २०२१ पासून वेळोवेळी तक्रारदार महिलेला माझ्याशी फ्रेंडशिप करशील का, आय लव्ह यू असं म्हणून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वागत होता. तसेच २१ मार्च २०२२ रोजी दुपारी १ वाजता तक्रारदार महिलेचा पाठलाग करून त्या राहत असणाऱ्या इमारतीच्या जिन्यामध्ये महिलेचा हात धरून थांब मला जरा तुझ्याशी बोलायचे आहे, तू मला उद्या भेटशील का, असं म्हणाला. त्यामुळे महिलेने वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा तांदळे व पोलीस अंमलदार सतीश पाटील यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून २४ तासात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.

टॅग्स :DhayariधायरीWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी