बेल्हा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:55+5:302021-05-05T04:16:55+5:30
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात महत्त्वाची मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर गेल्या सुमारे सतरा-अठरा वर्षांपासून शिवसेनेचे जुन्नर पंचायत ...

बेल्हा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वाघ
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात महत्त्वाची मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर गेल्या सुमारे सतरा-अठरा वर्षांपासून शिवसेनेचे जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती कै. राजाभाऊ गुंजाळ यांचे वर्चस्व होते. दरम्यान बेल्हा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांचे निधन झाल्याने येथील सरपंचपद रिक्त होते. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या एकूण १७ आहे. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आज (दि. ३) रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सरपंचपदासाठी गोरक्षनाथ रामदास वाघ, लिलाबाई पाराजी बोरचटे व बबन अर्जुन औटी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
या वेळी लिलाबाई बोरचटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार गोरक्षनाथ वाघ व शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार बबन औटी हे दोघे जण उभे राहिले. यांच्यात गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. या वेळी एकूण १७ पैकी गोरक्षनाथ वाघ यांना १० मते तर बबन औटी यांना ७ मते मिळाल्याने, सरपंचपदी गोरक्षनाथ वाघ विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन चौरे यांनी जाहीर केले. शिवसेनेकडे संख्याबळ असून सुद्धा शिवसेनेची मते फुटली. यानंतर नवनियुक्त सरपंच गोरक्षनाथ वाघ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार अतुल बेनके यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
--
फोटो क्रमांक : ०३गोरक्षनाथ वाघ
फोटो ओळी - गोरक्षनाथ वाघ