शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कोरोना रूग्णवाढीत वडगाव शेरी पुणे शहरात अव्वल; प्रभाग ५ मध्ये तर नऊ दिवसांत विक्रमी ११६४ रूग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 9:19 PM

पूर्वी दहा दिवसाला कोरोनाचे रुग्ण हजार होत होते. मात्र, आता दहा दिवसांमध्ये जवळपास अडीच हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

विशाल दरगुडे- 

चंदननगर: कोरोनीचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नियमावली तयार केलेली आहे.परंतू त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.बाजारापेठत आजही गर्दी दिसत आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुणे शहरामध्ये जोराने म्हणजे प्रथम क्रमांकांची आहे. यात वडगावशेरी-कल्याणीनगर प्रभाग ५ मध्ये दररोज सरासरी शंभरच्या पुढेच रूग्ण सापडत आहेत. काल तर उच्चांक १८२ रूग्ण सापडले आहेत. रुग्णवाढीचा दर दुप्पट झाला आहे.

पूर्वी दहा दिवसाला कोरोनाचे रुग्ण हजार होत होते. मात्र, आता दहा दिवसांमध्ये जवळपास अडीच हजार नवे रुग्ण रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात जास्त रुग्ण प्रभाग पाच वडगाव शेरी मध्ये आहे.

वडगाव शेरी – नगररोड क्षेत्रीय  कार्यालयाच्या हद्दीमध्ये गेल्या महिन्याभरामध्ये मोठया प्रमाणात रुग्ण वाढले आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये १८ सुक्ष्म प्रतिबंधित्र क्षैत्र आहेत.यामध्ये वडगाव शेरी, खराडी, लोहगाव, शास्त्रीनगर, विमाननगर, पोरवाल रोड या ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित्र क्षेत्र आहेत.   

कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तरी, अद्याप  नागरीक हे निर्बंध पाळत नाहीत.लग्नात पन्नास पेक्षा जास्त नागरीक असतात. मास्क आणि  सोशल डिस्टसिंगचा वापर करत नाही. दोनशे पेक्षा जास्त नातेवाईकामध्ये लग्न होत आहे. कल्याणीनगर, विमाननगर, वडगावशेरीमधील हॉटेल गर्दीने फुलले आहे.कुठेही कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत.  भाजी मंडई, मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. मास्क न वापरणाऱ्यावरील कारवाईच होत नाही. त्याचा गैरफायदा नागरीक घेतात.

दरम्यान,नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १५ ते २४ मार्च च्या दरम्यान २९३३ रुग्ण सापडले आहेत. खराडी येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले आहे. कोरोना रुग्ण वाढू नये. यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे.वडगाव शेरी प्रभाग ५ मध्ये ११६४ खराडी प्रभाग ४ मध्ये ८६३, विमाननगर प्रभाग 3 मध्ये ४९६ , लोहगाव प्रभाग ४२ मध्ये ४१० नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे.तरी देखील नगररस्ता क्षेत्रीय कार्यालायाला गांभीर्य नसून कडक निर्बंध करण्याची गरज आहे.वडगावशेरी-खराडी-लोहगाव-विमाननगरमधील नागरिकांना मात्र याची तमाच नसल्याचे वाढणाऱ्या आकडेवारीत दिसुन येत आहे.

वडगावशेरी,खराडी याठिकाणच्या बाजारपेठेत सकाळी संध्याकाळा गर्दी दिसते.फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.रिक्षातुन दोनच प्रवासी नेण्याचे बंधन असताना तिन प्रवासी घेऊन जातात..........कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडत्माक  कारवाई केली जात आहे.नगररस्ता आरोग्य विभागाकडून दररोज गर्दीच्या मास्क न वापरणे तसेच सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या ठिकाणी कारवाई केली जात आहे.

- सुहास जगताप,नगररस्ता क्षेत्रीय अधिकारी.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याvadgaon-sheri-acवडगाव शेरीhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका