शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांवर फेसबुकवर अश्लिल शेरेबाजी;सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:28 IST

त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की इव्हेन्ट मॅनेजर असे ट्टिव केले होते.

ठळक मुद्देफेसबुक अकाऊंटवर खूपच अश्लिल भाषेत मजकूर

पुणे : एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांच्या फेसबुक पेजवर अश्लिल शेरेबाजी करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ सिंहगड रोड पोलिसांनी ६ जणांवर विनयभंग, आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे़ श्रीकांत घोळवे, अमोल मुळे, गणेश जाधव, दशरथ मपलेकर, आसाराम सणस, मनिष चावरीया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहे. फिर्यादी या एक राजकीय पक्षाला पदाधिकारी आहेत.

त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की इव्हेन्ट मॅनेजर असे ट्टिवट केले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर खूपच अश्लिल भाषेत मजकूर लिहिला आहे. आय लव्ह यु अशी पोस्ट करुन त्यांच्याबद्दल असभ्य भाषेत अश्लिल शेरेबाजी केली आहे. त्यामुळे आपल्या मनास लज्जा उत्पन हाईल, असे कृत्य केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संचारबंदीच्या काळात लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना काळ्जी घ्यावी असे वारंवार पोलिसांकडून आवाहन करण्यात येते. किंबहुना पोलिसांचे या संवेदनशील काळात सोशल मीडियावर खूप बारकाईने लक्ष असल्याचे देखील काही दिवसांमधील सायबर क्राईमच्या वाढत्या कारवायांमुळॆ निदर्शनास आले आहे. असे असताना सुद्धा लोक बसल्या बसल्या रिकामटेकड्या वेळी कुठेतरी व्यक्त होतात आणि त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अशाचप्रकारे पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर  अश्लील शेरेबाजी करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणWomenमहिलाPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर