नाट्यपरिषद पुणे शाखेच्या निवडणुकीतील मतदान पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 21:08 IST2018-10-07T17:15:16+5:302018-10-07T21:08:09+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या निवडणुकीकडे राज्यातील समस्त रंगकर्मींचे लक्ष

नाट्यपरिषद पुणे शाखेच्या निवडणुकीतील मतदान पूर्ण
पुणे: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या निवडणुकीकडे राज्यातील समस्त रंगकर्मींचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत रविवारी 3.30 वाजेपर्यंत 700 पेक्षा जास्त मतदान झाले. टिळक स्मारक मंदिर परिसराला सार्वजनिक निवडणुकीचे स्वरूप आले होते. मतदानाची मुदत 4 वाजेपर्यंत होती. या दरम्यान एकूण 1350 पैकी 811 मतदान झाले.
रंगकर्मी, लोकमान्य आणि नटराज असे तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 19 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यासाठी 53 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप अकबर शेख या सदस्याने केला. आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला. याबद्दल उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र नंतर पाहू असे सांगून त्यांनी दुर्लक्ष केले, असे शेख म्हणाले. रविवारी रात्री उशीरापर्यंत या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे.