बटन दाबताच मिळतेय वोटरस्लिप

By Admin | Updated: January 8, 2015 01:04 IST2015-01-08T01:04:41+5:302015-01-08T01:04:41+5:30

स्पर्धात्मक युगात अद्यावत तंत्रज्ञान वेगवान कामासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे.

Voters slip getting hit by the button | बटन दाबताच मिळतेय वोटरस्लिप

बटन दाबताच मिळतेय वोटरस्लिप

पिंपरी : स्पर्धात्मक युगात अद्यावत तंत्रज्ञान वेगवान कामासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. इंटनेटच्या माध्यमातून सोशल मिडीयापासून मोबाईल, संगणक आणि इतर तांत्रिक गोष्टीचा वापर निवडणूकीत वाढला आहे. कॅन्टोन्मेंट निवडणूकीतही याचा वापर होताना दिसत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत सोशल माध्यमाचा वापर प्रकर्षाने दिसून आला. याच बळावर सत्तापालट झाल्याचे बोलले जात आहे. यावर पाऊल ठेवत याच पद्धतीने खडकी, देहूरोड आणि पुणे कॅन्टोन्मेंट निवडणूकीत प्रचार यंत्रणा राबविली जात आहे.
इंटरनेटद्वारे सोशल मिडीयाचा वापर करीत मतदारांशी संपर्क साधला जात आहे. याचा वापर महिन्यापूर्वीपासूनच सुरू झाला आहे. उमेदवारांचे छायाचित्र आणि केलेल्या कामाचा छायाचित्र आणि व्हिडीओ फेसबुक आणि व्हॅट्स अपवर झळकत आहेत. उमेदवाराच्या समर्थकांनी अनेक गु्रप तयार केले आहेत. या ग्रुपवर या संदेशाची सर्वांधिक देवाण घेवाण केली जात आहे. मतदारांचा मोबाईल क्रमांकांचा डाटा तयार करुन त्यांना न चुकता मेसेज केले जात आत आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे मेसेज उमेदवाराची छबी अधिक बळकट करीत आहेत. या कामासाठी काही उमेदवारांनी आयटी टिम किंवा एजन्सीची नेमणूक केली आहे.
एलसीडी डिसप्ले यंत्राद्वारे अनेकांनी अद्यावत प्रचार यंत्रणा राबविली आहे. रिक्षा आणि वाहनावर एलसीडी लाईटद्वारे चिन्ह आकर्षकरित्या सजविले आहेत. स्वत:चा आवाज मुद्रित केलेली सीडी वाहनांतून ऐकवली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवार नागरिकांशी संवाद साधत असल्याचा भास होतो. केलेली कामे, भविष्यात करणारे कामे, नागरिकांशी संवाद आदीविषयावर बनविलेली सीडी घरोघरी वितरीत केली जात आहे.
साध्या पत्रकातही आकर्षकता आणली गेली आहे. मार्केटींगसाठी प्रसिद्ध बलाढ्य कंपन्या तयार करीत असलेल्या माहितीपत्रकाप्रमाणे ही प्रचारपत्रके बनविली आहेत. ती संग्रहीत करावी अशी आहेत. कॅन्टोन्मेंट निवडणूकीत खर्चाची मर्यादा नसल्याने सर्व प्रकारच्या अद्यावत तंत्राज्ञानाचा वापर सढळ हाताने केला जात आहे. आकर्षक आणि जलद प्रचारासाठी उमेदवार खर्चाकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

४यादी नाव शोधण्याची तकतक नको म्हणून थेट वोटर सर्च मशिन उमेदवारांनी ठिकठिकाणी उपलब्ध करुन दिले आहे. हे मशिन इंटरनेटशिवाय चालतात. डिसप्लेवर नावाची काही अक्षरे दाबताच संपुर्ण नाव, पत्ता आणि मतदान केंद्राचे नावाची स्लिप मिळते. त्यावर उमेदवारांचे छायाचित्र आणि चिन्ह ही असते. त्यामुळे मतदारांना आपले नाव यादीत असल्याची खात्री होते आणि उमेदवारांचा प्रचारही होत आहे.
४लॅपटॉप, सीडी किंवा मतदार यादीत नाव शोधण्यासाठी लागणार वेळ वाचत आहे. त्याचबरोबर बस कंटक्टरकडे असलेल्या तिकीट यंत्राप्रमाणे वोटर सर्च मशिन सहजपणे बाळगता येते. घरोघरी जाऊन नावाप्रमाणे स्लिप काढून ती देणे सुलभ झाले आहे. हे यंत्र घेऊन कार्यकर्ते घरोघरी जाऊन वोटर स्पिलचे वाटप करीत आहेत.
४इलेक्ट्रानिक व्होटीग मशिनचे (इएमव्ही) हुबेहुब प्रतिकृती तयार करुन संबंधित चिन्हासमोरील बटन दाबण्याचे आवाहन केले जात आहे. या माध्यमातून मतदान प्रक्रिया नागरिकांना समाजावून सांगितली जात आहे.

Web Title: Voters slip getting hit by the button

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.