शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

मतदारांनो भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 9:56 PM

अजित पवार म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांना ६ हजार रुपये अर्थसहाय्य देते. महिलांना उज्वला गॅस योजना देण्यात आली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले. ऊसाची एफआरपी वाढविली.

बारामती - डोर्लेवाडी दि ४ (प्रतिनिधी) बारामतीच्या मतदारांनी भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करावे. मी भावनिक होऊन मते मागत नाही. विकासकामे पूर्ण करण्यासाठी मदत मागत आहे, विकास डोळ्यांपुढे ठेवून मतदान करा असे आवाहन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन शनिवारी (ता. ०४) सकाळी करण्यात आले होते. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी रासप नेते माजी मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांना ६ हजार रुपये अर्थसहाय्य देते. महिलांना उज्वला गॅस योजना देण्यात आली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले. ऊसाची एफआरपी वाढविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चांगली ओळख झाल्याने मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.  रासपचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले देशाचे संविधान कोणी बदलणार नाही.विरोधक याबाबत खोटा प्रचार करीत असल्याचे जानकर म्हणाले.      यावेळी मदन देवकाते,विश्वास देवकाते माजी , प्रशांत काटे , किरण तावरे , संभाजी नाना होळकर , राजेंद्र गावडे ,  ॲड.दिलीप धायगुडे ,  राहुल झारगड , पांडुरंग कचरे , डोर्लेवाडी गावचे सरपंच सुप्रिया नाळे,उपसरपंच छबूबाई मदने सर्व ग्रामपंचायत सदस्य , माऊली अण्णा नाळे,रमेश मोरे, बापू गवळी,अविनाश काळकुटे, भगवान शिरसागर , वसंतराव काळकुटे,अशोकराव घोरपडे, श्रीपती जाधव आदी उपस्थित होते.ॲड .संजय नाळे व ॲड.पंढरीनाथ नाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार विनोद नवले यांनी मानले.....त्याच वेळी आपला सुपडासाफ झाला असता२०१४ च्या निवडणुकीत खडकवासला येथे आपण थोडक्यात बचावलोे.त्यावेळी महादेव जानकर हे कमळ  चिन्हावर निवडणुक लढले असते तर आपला सुपडासाफ झाला असता.लोकांना मतदान केंद्रावर कपबशी  चिन्हाचे मतदान कमळाला जात असल्याचे समजत नव्हते.महादेव जानकर यांचे भाषण सुरु होते.यावेळी ते अजित पवार यांना मनमोकळा,भाबडा माणुस असे म्हणण्याएेवजी भामटा असे चुकुन बोलले.ती चुक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त केली.ते म्हणाले,अजितदादा कोणतेही काम होणार असेल तर तोंडावर सांगतात,असे जानकर म्हणाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ajit Pawarअजित पवारElectionनिवडणूकBaramatiबारामती