शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

सायकलीवरून शहरातील गणरायांचे दर्शन; आयटीतील तरुणाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 1:53 AM

आयटीतील तरुणाची गणरायाच्या दर्शनासाठी सायकलवारी

पुणे : तुम्हाला शहराच्या मध्यवर्तीमधील गणरायांचे दर्शन करायचे असेल, तर कोंडीमुळे दुचाकी, चारचाकी आणणे अवघड आहे; पण तरीही तुम्ही अतिशय कमी वेळेत आणि कुठेही कोंडीत न अडकता सायकलवरून दर्शन करू शकता. त्यामुळे एक तर प्रदूषण कमी होईल, तुमच्या इंधनाचे पैसे वाचतील आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. अशा अनके फायद्यांचा प्रसार व्हावा, यासाठी एका आयटीतील तरुणाने गणरायाच्या दर्शनासाठी सायकलवारी केली. मधुकर माझिरे असे त्या सायकलस्वाराचे नाव आहे.सध्या वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे शहरात दुचाकी, चारचाकी आणणे खूपच त्रासदायक ठरत आहे. त्यात आता गणेशोत्सव असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. परंतु, ही कोंडी कमी करायची असेल, तर आता सायकलस्वारी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी शेअरिंग सायकलही उपलब्ध करून दिल्या आहेत. हे सर्व विचार माझिरे यांच्या डोक्यात आले आणि त्यांनी सायकलवरून गणेश दर्शनाचा प्रयोग आज केला.याबाबत माझिरे म्हणाले, ‘‘मी आयटीमध्ये काम करतो. तेव्हा दुचाकीवरून कार्यालयात जातो. प्रचंड वाहतूककोंडीमुळे मी खूप वैतागतो. घरी आलो की, सर्व एनर्जी संपलेली असते. त्यामुळे दुचाकीवर गणपती दर्शन करणे म्हणजे पुन्हा डोकेदुखीच. म्हणून मी सायकलवर दर्शन करण्याचे ठरविले. मला सायकलची खूप आवड असल्याने मी हा उपक्रम केला. तसेच, कोथरूड वाहतूक सल्लागार समितीचा सदस्य असल्याने सायकल वापरून प्रदूषणही कमी केले. शहरातील अनेकांनी असा प्रयोग केला, तर कोंडी कमी होऊ शकतो. महापालिकेने सायकलही उपलब्ध करून दिल्या आहेत.’’तीन तासांत गणरायांचे दर्शनआज सकाळी ११ वाजता त्यांनी कोथरूड येथून सुरुवात केली आणि नदी पात्राच्या रस्त्यातून मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर तेथून आजूबाजूचे गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती, गुरुजीतालीम, बाबू गेनू, तांबडी जोगेश्वरी या गणरायांचे दर्शन घेऊन, त्यांनी नारायण पेठ ते नवी पेठ अशी दर्शनवारी केली.या संपूर्ण दर्शनाला त्यांना तीन तास वेळ लागला. सकाळी ११ वाजता सुरू केलेली ही दर्शनवारी दुपारी २ वाजता संपली. यामध्ये त्यांनीमध्यवर्ती भागातील मानाचे गणपती व इतर २५ गणपतींचे दर्शन घेतले.अनेक मंडळांकडून उपक्रमाचे स्वागतया उपक्रमाला त्यांना ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच मंडळांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सायकल प्रत्येक मंडळाच्या मंडपापर्यंत घेऊन जाता आली. तसेच, कुठेही गर्दीचा त्रास झाला नाही किंवा गर्दीत सायकल अडकली नाही. हा उपक्रम केल्यानंतर, माझिरे यांना अनेक त्यांच्या मित्रांनी, परिचित असणाºयांनी आम्ही ही यामध्ये सहभागी होण्यास उत्सुकअसल्याचे सांगितले. अनेकांनी सायकल क्लब बनविण्याचे विचारही व्यक्त केले.सायकलवरून दर्शनाचे फायदेवाहतूककोंडीतून सुटकाप्रदूषण कमी होतेइंधनाची बचतआरोग्यासाठी उपयुक्त

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणे