"ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा”, प्रवाशाचा PMP बसमध्ये बोभाटा! पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 12:59 IST2022-10-15T12:53:22+5:302022-10-15T12:59:02+5:30
व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

"ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा”, प्रवाशाचा PMP बसमध्ये बोभाटा! पाहा व्हिडिओ
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होतोय. एक प्रवासी एसटीने प्रवास करत आहे. अशात त्याला ज्या ठिकाणी उतरायचं आहे तिथं बसं थांबत नाही. ड्रायव्हर त्याला पुढच्या स्टॉपवर उतरायला सांगतो. पण हा प्रवासी ऐकत नाही. तो एसटीतच ‘वाचवा, वाचवा’ असं ओरडायला लागतो. ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा असं हा प्रवासी ओरडतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड गावामध्ये जाणाऱ्या बसमधील तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तरुणाला पीएमपीएल खाली उतरायचं होत मात्र बस चालकाने त्या ठिकाणी स्टॉप नसल्यामुळे बस थांबवली नाही त्यामुळे संतप्त प्रवाशाने बसमध्ये वाचवा…वाचवा म्हणत आकांडतांडव करण्यास सुरुवात केली.
ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा...! पुण्यातील पीएमपी बसमधील व्हिडिओ व्हायरल#PMP#Punepic.twitter.com/YuFx1vM2OJ
— Lokmat (@lokmat) October 15, 2022