शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात शेळी, कुत्रे यांच्यासहीत लहान मुलांचा बळी घेणारा हिंसक बिबट्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:25 IST

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शिरूर तालुकयातील मांडवगण फराटा सह परिसरात २५ पिंजरे लावले होते

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा ( ता. शिरूर ) व परिसरामध्ये असलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच या परिसरातील तरुण व ग्रामस्थ गेले आठ ते दहा दिवसांपासून अहोरात्र मेहनत घेत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सोमवारी रात्री वडगाव रासाई शिवारात एक बिबट्या पिंजर्‍यात अडकला. पकडलेल्या या बिबट्याची माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.            शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरामध्ये अनेक बिबट्यांचा वावर असून, बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभाग मात्र अपयशी ठरत होता. एक महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी दोन लहान मुलांचा बिबट्याने बळी घेतला आहे. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पंचवीस पिंजरे लावले, पिंजर्‍यात बिबट्या साठी भक्ष्य ठेवण्यात येत होते, तसेच थर्मल कॅमेरे बसविण्यात आले, रात्रीच्या वेळी ड्रोनच्या सहाय्याने टेहळणी केली तरीही बिबटे दिसून येत नव्हते. त्यामुळे बिबटे कधी पकडले जाणार आणि त्यांचा उपद्रव कधी संपणार, असे प्रश्न ग्रामस्थ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारत होते.            या परिसरात बिबट्यांनी वारंवार हल्ले करून अनेक शेळ्या, कुत्री ठार केली आहेत. महिनाभरापूर्वी एक तसेच दहा बारा दिवसांपूर्वी दुसऱ्या लहान मुलाचा बळी बिबट्याने घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत होते. बिबट्यांमुळे शेतीची दैनंदिन कामेही रखडत आहेत. ग्रामस्थांना दिवसाही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. कधी बिबट्या हल्ला करेल, याचा नेम नाही. शेतीची कामे देखील थांबली आहेत. रात्रीचा प्रवास तर चारचाकीशिवाय करताच येत नाही. ऊसतोडीसाठी कामगार येण्यास धजावत नाहीत. पाहुणेमंडळी तर यायलाच नको म्हणत आहेत. अनेक बिबट्यांना मधील एक बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून या परिसरातील बाकीच्या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरleopardबिबट्याforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणdogकुत्राNatureनिसर्ग