गावांना जातिवाचक नावांऐवजी मूल्यांशी संबंधित नावे देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:14+5:302021-06-26T04:09:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून अशा नावांऐवजी महापुरुषांची व ...

गावांना जातिवाचक नावांऐवजी मूल्यांशी संबंधित नावे देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून अशा नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत असलेली नावे देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.
बैठकीस जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त रंजना गगे, समाजकल्याण सहायक आयुक्त संगीता डावखर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, मुख्याधिकारी, राजगुरुनगर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सर्व ग्रामपंचायत पातळीवर जातिवाचक असलेली गावे, रस्ते व वस्त्यांच्या नावांची यादी करून ती नावे बदलण्याबाबत गावकऱ्यांना अवगत करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. ही कार्यवाही ग्रामसभा/ बैठक घेऊन त्वरित करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीची प्रत व नावे बदलेल्या गावांची /वस्त्यांची/रस्त्यांची यादी समितीस सादर करावी. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी नावे बदलण्याची कार्यवाही १५ दिवसांमध्ये करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीस सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
00000