शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विमानतळाविरोधात गावे एकवटली;शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 5:02 AM

नायगाव, पांडेश्वरमध्ये आज होणार बैठक, हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्याची जागा निश्चित झालेली नाही. विमानतळ बाधित क्षेत्रात पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना असल्याने या ठिकाणचा शेतकरी ऊसशेती पिकवू लागला आहे. 

सोन्यासारख्या जमिनीवर विमानतळाचे भूत बसल्याने पुरंदरच्या पूर्व भागातील शेतकरी हैराण झाला आहे. याविरोधात येथील गावे एकत्र आले असून जमिनी न देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रजासत्ताक दिनाला नायगाव, पांडेश्वर येथे ही बैठक होणार आहे. जमीन न देण्याचा एकमुखी ठराव ही गावे करणार आहेत. पुरंदर विमानतळाविरोधात येथील गावे एकवटली आहे. कितीही  किंमत मोजावी लागली, तरी विमानतळ होऊ देणार नाही, असा बैठकीत निर्णय करुन विमानतळ विरोधी घोषणा देण्यात आल्या. हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

दिवसेंदिवस पुरंदर तालुक्यातील नियोजीत विमानतळ वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, मावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी पुरंदरच्या पूर्व भागातील गावोगावी बैठका घेण्यात येत आहेत. व विमानतळाला विरोध केला जात आहे.  कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे विमानतळ होऊन द्यायचे नाही. जमिनी द्यायच्या नाहीत या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. पुरंदर तालुक्यातील नियोजित सात गावांतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेत बदल करून पूर्व भागातील रिसे, पिसे, पांडेश्वर व आसपासच्या परिसरात विमानतळ हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी नायगाव व पांडेश्वर येथे ग्रामस्थांनी बैठकीचे नियोजन केले आहे. यावेळी विमानतळ आमच्याकडे नकोच, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. आमच्या वडिलोपार्जित जमिनी जबरदस्तीने विमानतळासाठी बळकावून आम्हाला भकास करू नका. असा सूर येथील शेतकऱ्यांनी लावला आहे. 

सर्वपक्षीय कार्यकर्ते राहणार उपस्थित २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पूर्व भागातील विमानतळबाधित सर्व गावांची बैठक नायगाव येथील सिध्देश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच या बैठकीला सर्व गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना बोलवणे. व त्यांची विमानतळ विषयी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचे ठरले आहे. जागा निश्चित न झाल्याने पुरंदर तालुक्यातील विनामतळाला पुन्हा विरोध होण्यास सुरूवात झाली आहे. तर खेड तालुक्यात विरोध मावळत आहे. बारामतीच्या विकासाठीच हे विमानळ पुरंदरला होत असल्याचा आरोप होत आहे. 

 

टॅग्स :Airportविमानतळ